Agriculture Subsidy

Agriculture Subsidy । विहिरीसाठी मिळतंय चार लाख रुपये अनुदान; लगेचच करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

शासकीय योजना

Agriculture Subsidy । शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सतत कल्याणकारी योजना (Government Schemes) राबवत असते. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. जर तुम्हाला विहीर खोदायची असेल तर तुम्हालाही अनुदानाचा लाभ घेता येईल. सरकार आता विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये अनुदान (Subsidy) देत आहे. जर तुम्हालाही या अनुदानाचा (Government Subsidy) लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही अटी मान्य कराव्या लागतील.

Havaman Andaj । ‘या’ राज्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल, मिचॉन्ग चक्रीवादळाचं संकट; 5 डिसेंबरला धडकणार

मनरेगा (MNREGA) म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून सिंचन विहीर आणि फळबाग योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्याला सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपये तर फळबागेसाठी दीड ते दोन लाख रुपये अनुदान (MNREGA Schemes) देण्यात येते. पूर्वी शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागत होता.

Eucalyptus Farming । ‘या’ एका झाडाची लागवड केल्यास शेतकरी होईल मालामाल; खर्च कमी आणि लाखोंचा नफा

परंतु, त्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आता हा अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने सोप्या पद्धतीने करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे, हे समजते. सरकारने सिंचन विहीर व फळबाग योजनेचे अर्ज करण्यासाठी एक अॅप तयार केले आहे. याच्या मदतीने तुम्हाला घरीबसुन अर्ज करता येईल.

Banana Farming । बापरे! केळीच्या बागेतून 9 महिन्यात केली तब्बल 80 लाखाची कमाई, कसं केलं नियोजन? एकदा वाचाच

यानंतर तुमचा अर्ज पंचायत समितीकडे दाखल होईल. तुमच्या ऑनलाईन अर्जावर तात्काळ कार्यवाही केली जाईल. या अर्जाची सद्यस्थिती लाभार्थ्यांला समजते. त्यामुळे सरकारकडून लवकरात लवकर या अर्जाचा लाभ घ्या, असे आवाहन केले जात आहे.

Sugarcane Variety । शेतकऱ्यांनो, करा ‘या’ उसाच्या जातीची लागवड! देईल साखरेचा जास्त उतारा आणि पाणीही लागेल कमी

आवश्यक कागदपत्रे

  • 8-अ चा ऑनलाईन उतारा
  • सातबाराचा ऑनलाईन उतारा
  • मनरेगा जॉब कार्डची प्रत
  • सामुदायिक विहीर घ्यायची असेल तर सर्व जण मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा आणि समोपचारानं पाणी वापराबाबतचं सर्वांचं करारपत्र

Price of flour and pulse । सर्वसामान्यांना सहन करावी लागणार महागाईची झळ! पीठ आणि डाळी महागणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *