Pomegranate Insurance | राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये डाळिंबाचे (Pomegranate) उत्पादन घेतले जाते. परंतु हवामानातील बदल, अचानक येणारे आजार यामुळे डाळिंबाच्या बागांचे बऱ्याचदा नुकसान होते. यावर पर्याय म्हणून डाळिंबांच्या बागांना विमा संरक्षण (Insurance) देणारी योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना अधिसूचित जिल्हा आणि तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.
राज्य शासनाच्या महावेद प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रामध्ये नोंदविलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार या विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून परस्पर नुकसान भरपाई देण्यात येते. विमा संरक्षण कालावधीमध्ये हवामान धोक्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीला विमा संरक्षण प्रदान करण्यात येते. महत्त्वाची बाब म्हणजे 2 वय वर्षे पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागच विमा संरक्षणास पात्र असते.
Eligiblity Criteria | कोणते शेतकरी लाभ घेऊ शकतात ?
१) या योजनेमध्ये अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी देखील भाग घेवू शकतात. परंतु, भाडेकरार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
२) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी या योजनेतील सहभाग पूर्णतः ऐच्छिक असणार आहे.
३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत विमा हप्ता जमा करून सहभाग घेवू शकतात.
Success Story | डाळिंबाची शेती करून तरूण शेतकऱ्याने कमावले कोट्यवधी रुपये!
Important Documents | आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) ७ /१२ आणि ८(अ) उतारा
3) पीक लागवड स्वयंघोषणा पत्र
4) फळबागेचा जीओ टॅगींग (Geo Tagging) केलेला फोटो
4) बँक पासबुक झेरॉक्स
अर्ज कोठे भरावा ?
कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
Inspirational Story | शेतातील तण विकून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये! या पठ्ठ्याची कमाल एकदा वाचाच…