Sarkari Yojna

Sarkari Yojna । मुलीच्या लग्नाची कटकट संपली! सरकारची ‘ही’ योजना देईल ६४ लाख रुपये

शासकीय योजना

Sarkari Yojna । केंद्र आणि राज्य सरकार सतत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना (Government Scheme) सुरु करत असते. आर्थिक दृष्ट्या जनता मजबूत होण्यासाठी सरकार या योजना सुरु करते. त्याचा देशभरातील करोडो नागरिक लाभ घेत आहेत. परंतु, असेही काहीजण आहेत ज्यांना या सरकारी योजनांची माहिती नसते, त्यांमुळे त्यांना या योजनांची माहिती नसते. असे असल्याने ते सरकारी लाभांपासून वंचित राहतात.

Urea Price । ४५ किलो नाही तर आता मिळणार ४० किलोची युरियाची बॅग, दरात देखील होणार २४ टक्क्यांची वाढ

प्रत्येक पालकांना आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावत असते. अनेक पालक मुलीच्या लग्नासाठी कर्ज (Loan) काढत असते. काहींना हे कर्ज फेडणे शक्य होत नाही. कर्ज फेडता न आल्याने अनेकजण टोकाचा निर्णय घेतात. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुलींसाठी एक खास योजना (Government Scheme for Girls) आणली आहे. सुकन्या समृद्धी योजना असे या योजनेचे (Sukanya Samriddhi Yojana) नाव आहे.

Wild animal attacks । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मिळणार २० लाख रुपये

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी या योजनेचा व्याजदर दर 3 महिन्यांसाठी निश्चित करण्यात येतो. एप्रिल ते जून 2023 साठी सुकन्या समृद्धी योजनेत (Scheme for Girls) नवीन 8% इतका व्याजदर लागू करण्यात आले आहे. परंतु, २०२४ च्या व्याजरात अजून कोणताही बदल करण्यात आला नाही. अजूनही या योजनेचे दर जैसे थे आहेत. लवकरच या व्याजदरात बदल करण्यात येईल. (Scheme For Girls Marriage)

Jowar Market । ज्वारीच्या दरात खूप मोठी घसरण, जाणून घ्या नवीनतम दर

मुलगी जन्माला आल्याबरोबर या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी लगते. गुंतवणूक करण्यासाठी मुलीचे वय १० वर्षांपेक्षा जास्त नसावे, हे लक्षात ठेवा. जर तुमच्या मुलीचे वय १० वर्षांच्या आत असल्यास तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेता येईल. तुम्हाला १५ वर्षे या योजनेत गुंतवणूक करावी लागते. हे पैसे मुलीचे वय १८ झाल्यावर यातील मॅच्युरिटीच्या करमेतून ५० टक्के रक्कम मिळते. उरलेली रक्कम मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळते.

Success Story । शेतकऱ्याचा नाद नाही! स्ट्रॉबेरीतून मिळवलं लाखोंचं उत्पन्न, असं केलं नियोजन

असे मिळतील ६४ लाख रुपये

या योजनेत तुम्हाला प्रत्येक महिन्याला १२,५०० रुपयांचा हप्ता जमा करावा लागेल. असे केले तर एका वर्षात तुमचे १.५ लाख रुपये जमा होतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जमा रकमेवर तुमच्याकडून कोणताही कर आकारला जात नाही. मॅच्युरिटीपर्यंत ७.६ टक्के व्याज दर जरी पकडला तरी यातून मोठी रक्कम उभी राहते. १२,५०० चा हप्ता असेल तर तुमच्याकडे आरामात ६४ लाख रुपये जमा होतात.

Onion Exprot Ban । धक्कादायक! कांद्यामुळे रखडली शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने, नेमकं प्रकरण काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *