KVP Scheme । अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळवता येत नाही. त्यामुळे अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय करतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य आणि केंद्र सरकारने अनेक योजना (Government Scheme) सुरु केल्या आहेत. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. दरम्यान, सरकारची अशीच एक खास योजना आहे, या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला डबल पैसे मिळतील. काय आहे सरकारची ही योजना? जाणून घ्या.
Dhananjay Munde । आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा! मिळणार संसार उपयोगी साहित्य किट
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून केंद्र सरकार किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) योजना चालवत आहे. जर तुम्हाला कमीत कमी वेळेत दुप्पट परतावा पाहिजे असेल तर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. 115 महिन्यांमध्ये ही रक्कम दुप्पट होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना सरकारची असल्याने या योजनेमध्ये तुमचे पैसे बुडत नाही. तुम्ही बिनधास्त या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.
MS Dhoni । धोनीकडे आहे ‘या’ लोकप्रिय कंपनीचा ट्रॅक्टर, ज्यामुळे शेतीची कामे होतात सोपी
आवश्यक कागदपत्रे
- केवायसी प्रक्रिया अनिवार्य
- आयडी आणि पत्त्याची कोणतीही प्रमाणित प्रत
- पॅन कार्ड आणि आधारकार्ड
- मतदार आयडी
- ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट
व्याजदर किती?
तुम्हाला या योजनेमध्ये वार्षिक 7.5 टक्के व्याजदर देते. समजा तुम्ही किसान विकास पत्रामध्ये एकरकमी 5000 रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीच्या वेळी ही रक्कम डबल होते. ही रक्कम गुंतवणूकदाराच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते.
Agriculture Mechanization । मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरणाचे थकले २ कोटी ६८ लाख रुपयांचे अनुदान