Agriculture Mechanization । दरवर्षी शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसतो. त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. साहजिकच शेतकरी बँकेकडून कर्ज घेतात. परंतु अनेकदा त्यांना कर्ज फेडणे शक्य होत नाही. त्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. एका सरकारी अनुदानाचे (Agriculture Subsidy) २ कोटी ६८ लाख रुपये थकले आहेत.
Government Schemes । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दिवसाही मिळणार वीज
मागील आठ महिन्यांपासून कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतील ३९२ शेतकऱ्यांचे दोन कोटी ६८ लाखांचे अनुदान (Government Subsidy) रखडले आहे. अनुदान मिळवण्यासाठी शेतकरी कृषी कार्यालयाकडे सतत फेऱ्या मारत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अनुदानाबद्दल विचारणा केली असता अनुदानाची रक्कम जमा झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.
Milk Rate । सणासुदीच्या काळात पशुपालकांना मोठा धक्का, गाईच्या दूध दरात मोठी घसरण
त्यामुळे शेतकरीवर्ग कमालीचा नाराज झाला आहे. अनुदानाची रक्कम लवकरात लवकर जमा करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतकरी कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानाच्या रकमेचा आतुरतेने वाट पाहत आहेत.
यासाठी मिळते अनुदान
या अभियानात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांनी पेरणीयंत्र, राष्ट्रीय गळीत धान्य आणि तेलताड अभियान, मळणीयंत्र, रोटावेटर, कल्टीवेटर, विद्युत मोटार, पाईप, यांसह इतर अवजारे आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात येत आहे.
Havaman Andaj । राज्याला अवकाळी पावसाचा फटका, ‘या’ जिल्ह्यांत होणार दमदार पाऊस