Bamboo Farming

Bamboo Farming । बांबू लागवडी संदर्भात एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!

शासकीय योजना

Bamboo Farming । केंद्र आणि राज्य सरकार आता कोणताही व्यवसाय असो किंवा शेतीतील कोणती कामे असो, आता प्रत्येक क्षेत्रात सरकार मदत (Government schemes) करत आहे. ज्याचा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना चांगला फायदा होत आहे. पण काही योजना अशा आहेत, ज्यांची अनेकांना माहिती नसते. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्व विभागांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

Orange Farming । संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी समोर आली सर्वात मोठी आनंदाची बातमी!

मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

येत्या 5 वर्षात राज्यात 10 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड (Planting bamboo) उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. हे उद्दिष्ट सध्या करण्यासाठी बांबू टास्क फोर्सच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या सर्व विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांच्याकडून उपस्थित विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. (Bamboo cultivation)

Animal Husbandry । पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज, जाणून घ्या

टास्क फोर्स गठीत

दरम्यान टास्क फोर्सची पहिली बैठक एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना सोबत राज्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड होण्यासाठी कामे करावीत, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले असून आता राज्यात बांबू लागवड योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स गठीत केली आहे.

Havaman Andaj । महाराष्ट्राच्या ‘या’ भागात आजही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यासाठी मोठे प्रोत्साहन देण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसात झालेल्या राज्य मंत्रिमंळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी हेक्टरी सात लाख रुपये अनुदान आणि रोपांसाठी अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला असल्याने आता बांबू लागवड योजनेमुळे राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

Dairy Farmers । मोठी बातमी! राज्यातील दूध उत्पादकांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

दरम्यान, या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह राज्याच्या कृषी, वन आणि पर्यावरण, रोहयो विभाग, आदिवासी विकास या विभागांतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Cotton Market । कापसाच्या दरात वाढ, किती मिळतोय दर? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *