Government Schemes । प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी त्यांच्यावर आर्थिक संकट येते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आणत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. केंद्र सरकारची अशीच एक योजना आहे जिच्या मार्फत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6 हजार रुपयांची मदत केली जाते. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
सरकारच्या या योजनेचे नाव पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) असे आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेला जगातील सर्वात मोठी DBT योजना (Direct Benefit Transfer) असेही म्हटले जाते. सरकारने या योजनेचे आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे शेतकरी 15 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
Sugar Factory । 1 नोव्हेंबरला पेटणार का कारखान्याचं धुराडं? मंगळवारी बैठकीत होणार निर्णय
या योजनेचा पुढील म्हणजे 15 वा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. जर तुम्ही अजून या योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर लगेच करा. नाहीतर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. 14 वा हप्ता हा 27 जुलै 2023 रोजी वितरित करण्यात आला आहे. दरम्यान, पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी आणि आधार सीडिंग करणे बंधनकारक केले आहे.
Havaman Andaj । नागरिकांना सोसावा लागणार उन्हाचा चटका! मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु
आधार लिंक न करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसान योजनेच्या सहा हजार रुपयांच्या यादीतून वगळले जाणार आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेमध्ये सहभागी असणाऱ्यांना आता सरकारने ई- केवायसी (E-KYC) करणे बंधनकारक केलं आहे. त्यासाठी सरकारने आतापर्यंत त्यांना पाच वेळा मुदतवाढ दिली होती.
Black pepper । करा ‘या’ गुणकारी काळ्या मिरीची शेती, एका झाडापासून मिळेल हजारोंचे उत्पन्न