MGNREGA । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अर्थात मनरेगा. मनरेगा ही भारत सरकारद्वारे लागू करण्यात आलेली रोजगार हमी योजना आहे, जी ७ सप्टेंबर २००५ रोजी विधानसभेत मंजूर झाली आहे. मंजुरीनंतर २ फेब्रुवारी २००६ रोजी एकूण २०० जिल्ह्यांत याची सुरुवात झाली आहे. ही एकमेव योजना (Government Schemes) आहे जी १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देते. त्याशिवाय राज्य सरकार २६५ दिवसाची हमी देते.
Success Story । शेतकऱ्याचा नादच नाही! अवघ्या एका एकरात घेतले कोहळ्याचे पाच टन उत्पन्न
या योजनेमध्ये कुक्कुटपालन शेड, शेततळे बांधणे आणि फळबागांची लागवड यांसारखी कामे करून घेतली जातात. अनेकांना मनरेगाची कामे आपल्या गावात सुरु आहेत की नाहीत? याबाबत कसलीच कल्पना नसते. त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. जर तुम्हालाही या कामांबद्दल माहिती नसेल तर काळजी करू नका. आता तुम्ही घरबसल्या या कामांबद्दल (MGNREGA Schemes) जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
फॉलो करा या स्टेप्स
- सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर नरेगा सर्च करावे लागणार आहे. लगेचच तुमच्यासमोर महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट या नावाचे एक पेज ओपन होईल. या ठिकाणी क्लिक केले की मनरेगाचे पेज तुमच्यासमोर येईल.
- आता डाव्या बाजूला पंचायत या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला एका नवीन पेजवर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा पंचायत असे तीन पर्याय पाहायला मिळतील. त्यापैकी ग्रामपंचायत या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे तुमच्यासमोर एक नवीन कॉलम ओपन होईल. त्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या जनरेट रिपोर्ट्स या पर्यायावर क्लिक करा.
- आता देशातील संपूर्ण राज्यांची नावे असा पर्याय येईल. यातील महाराष्ट्र या नावावर क्लिक करा. क्लिक करताच तुमच्यासमोर ग्रामपंचायत मॉड्युल नावाचे पेज ओपन होईल.
- आता तुम्हाला आर्थिक वर्षाची निवड करून जिल्हा, तालुका आणि मग गावाचे नाव निवडावे लागेल.
- ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर तुम्हाला प्रोसिडवर क्लिक करावे लागेल.
- तुमच्यासमोर ग्रामपंचायत रिपोर्ट्स नावाचे एक पेज ओपन होईल. यात R1, R2, R3, R4, R5 आणि R6 अशाप्रकारे कॉलम तुम्हाला पाहायला मिळतील.
- R5 या कॉलम मधील लिस्ट ऑफ वर्क या पर्यायावर क्लिक करा. वर्क एक्सपेंडीचर एक पेज ओपन होईल.
- पुढे कामाचा प्रकार निवडा. समजा तुम्हाला सर्व कामांचे स्टेटस जाणून घ्यायचं असेल तर ऑल हा पर्याय निवडा.
- तुम्ही वर्क स्टेटस या पर्याय समोर सुरु असणारी कामे, किती कामांना मंजुरी मिळाली व किती पूर्ण झाली? अशी माहिती जाणून घेऊ शकता.
- सर्वात शेवटी फायनान्शिअल इयर या कॉलम मधील ऑल या रकान्यासमोर क्लिक करताच तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या गावातील मागील वर्षातील मनरेगाच्या कामांची यादी पाहायला मिळेल.