Success Story । फक्त अशिक्षित नाही तर आता सुशिक्षित लोकही शेतीकडे वळू लागले आहेत. कारण शेतीत आता नोकरी आणि व्यवसायापेक्षा जास्त पैसे मिळत आहेत. अनेकजण तर चांगला पगार असणारी नोकरी सोडून शेती करत आहेत, शेतकरी सध्या शेतीत विविध प्रयोग करत आहेत. आधुनिक पिकांमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे. शेतीत फक्त कठोर मेहनत आणि योग्य नियोजनाची गरज असते.
अशी केली सुरुवात
कर्जत तालुक्यातील एका शेतकऱ्याने १ एकर क्षेत्रात कोहळा पिकाची लागवड (Cultivation of Kohala) केली होती. त्यात त्यांना पाच टनाचे उत्पन्न मिळाले. अरुण वेहले असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांनी आता कोहळ्यावर प्रक्रिया उद्योग करण्याचा निश्चय केला आहे. शिवाय त्यांनी इतर आंतरपिकेदेखील घेतली होती. या पिकांमधुन त्यांना कोहळ्यापासून दीड लाख आणि इतर आंतरपिकांतून एकूण तीन ते साडेतीन लाखांची कमाई करता आली आहे.
अरुण वेहले यांना वडिलोपार्जित शेती आहे. त्यांनी सुरुवातीला भातशेती केली होती. त्यातून त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते, त्यामुळे त्यांनी जोडशेती म्हणून टोमॅटोची लागवड केली. परंतु, त्यातूनदेखील त्यांना पाहिजे तसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यांनी पुढे शिराळी, घोसाळी, दुधी, पडवळ या भाज्यांची लागवड केली. त्यानंतर त्यांनी कोहळ्याचे पीक (Information of Kohala Cultivation) घेण्याचे ठरवले. १ एकर क्षेत्रात त्यांनी कोहळ्याच्या पिकाची लागवड केली.
SCSS । दरमहा 20,500 रुपये कमावण्याची सुवर्णसंधी! शेतकऱ्यांनो त्वरित करा ‘या’ योजनेत गुंतवणूक
सेंद्रिय पद्धतीने लागवड
महत्त्वाचे म्हणजे सेंद्रिय पद्धतीने लागवड करून वेहले यांनी कोहळ्याची शेती केली. आज एका वेलीवर ४ किलोचे फळ आले आहे. दसरा आणि दिवाळीच्या दिवशी कोहळ्याला चांगली मागणी असते. या हंगामात तयार झालेल्या फळातून त्यांना एक ते दीड लाख उत्पन्न मिळते. शिवाय इतर भाजीपालामधून त्यांना वार्षिक उत्पन्न हे साडेतीन लाखांच्या आसपास मिळते.
Fruit processing industry । लगेचच सुरु करा फळप्रक्रिया उद्योग, सरकार देतंय १० लाखांपर्यंत अनुदान