Success Story

Success Story । शेतकऱ्याची कमालच न्यारी! उजनीच्या तीरावर केली स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड, सव्वा एकरात मिळाले तब्बल २० लाखांचे उत्पन्न

यशोगाथा

Success Story । अलीकडच्या काळात पारंपरिक पिकांना अपेक्षित भाव मिळत नाही. कमी भावामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. शेतकरी आता पारंपरिक पिके न घेता आधुनिक पिके घेऊ लागले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पिकांना बाजारात चांगला हमीभाव मिळतो. शिवाय शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत नाही. शेतकरी आता विविध प्रयोग करू लागले आहेत.

Asafoetida History | जेवणाची चव वाढवणारा हिंग भारतात कोठून आला? जाणून घ्या हिंगाचे आरोग्यदायी फायदे

स्ट्रॉबेरी (Strawberries) पीक प्रामुख्याने महाबळेश्वरमध्ये घेतले जाते. कारण या ठिकाणी थंड हवामान असते. जे स्ट्रॉबेरीसाठी खूप फायदेशीर असते. एका शेतकऱ्याने चक्क उजनीच्या तीरावर स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड (Cultivation of strawberries) केली आहे. दादासाहेब पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी केवळ सव्वा एकरात लागवड केली. चवीने थोडीशी आंबट गोड असणाऱ्या स्ट्रॉबेरीला चांगली मागणी असते.

Milk Rate । दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आंदोलन करणार, तारीखही झाली निश्चित

अशी केली सुरुवात

महाबळेश्वरमधून पाटील यांनी २५ हजार स्ट्रॉबेरीची रोपे (Strawberries Cultivation Information) मागवली होती. त्यातून त्यांनी तीन बाय तीन फुटांवरती बेड काढले. एका बेडवर सहा रांगा असून दोन बेडमधील अंतर ३ फूट इतके आहे. एका स्ट्रॉबेरीच्या महत्त्वाचे म्हणजे स्ट्रॉबेरीच्या चारही बाजूने केळी आणि ऊस आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीला चांगले वातावरण मिळाले. स्ट्रॉबेरीला पुणे आणि मुंबईच्या मॉलमध्ये चांगली मागणी आहे. या ठिकाणी स्ट्रॉबेरीला तीनशे रुपये किलो दर मिळतो. पाटील यांना स्ट्रॉबेरीतुन सव्वा एकरात २० लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Tur Market Today । शेतकऱ्यांची पुन्हा निराशा! कमी झाले तुरीचे दर, प्रति क्विंटल दोन हजारांचा फटका

स्ट्रॉबेरी लागवड करताना कोणती काळजी घ्यावी?

स्ट्रॉबेरीची गादीवाफ्यावर 60 बाय 30 सेंटिमीटर अंतरावर लागवड करणे गरजेचे असते. यावर दोन ओळी, तीन ओळी अथवा चार ओळी पद्धतीने लागवड करतात. दोन ओळीसाठी 90 सेंटिमीटर रुंद आणि 30 ते 45 सेंटिमीटर उंची असणाऱ्या एका दिवसावर दोन रोपातील अंतर 30 सेंटिमीटर आणि दोन ओळींतील अंतर 60 सेंटिमीटर ठेवावे. दोन ओळी पद्धतीत प्रति एकर 22 ते 25 हजार रोपांची गरज असते.

Success Story । नोकरीला लाथ मारली अन् सुरु केला चहाचा कुल्हार बनविण्याचा व्यवसाय, गावातील अनेकांना दिला रोजगार; ३१ वर्षीय तरुण कमावतोय लाखो रुपये

तसेच तीन ओळी पद्धतीसाठी 120 सेंटी मीटर रुंद आणि 30 ते 45 सेंटिमीटर उंचीचे गादी वाफे, चार ओळी पद्धतीने लागवड होत असली तरी अंतर मशागत, फळ तोडणी, गादीवाफ्यात प्लास्टिक मल्चिंग करावी. या पिकाची मुळे मातीच्या वरच्या पंधरा ते वीस सेंटीमीटरपर्यंत थरात वाढतात.

PM Kisan Yojana । निवडणुकांपूर्वी सरकार देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! खात्यात येणार ‘इतके’ पैसे

असे असावे हवामान

या पिकासाठी थंड हवामान चांगले असते. हिवाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या दिवसात दहा अंश ते 25 अंश सेंटिग्रेड तापमान असावे. उष्ण हवामानात 20 ते 25 अंश सेंटिग्रेड असल्यास फळधारणा दीर्घकाळ चालू राहते.

Success Story । छोट्या जागेत मोत्यांची शेती करून शेतकरी कमावतोय लाखो रुपये; जाणून घ्या कशी केली जाते शेती?

रोगनियंत्रण

पानावरील ठिपके
उपाय- रिमोन 25 ते 30 मिली घेऊन फवारावे.

Success Story । भारीच! फुलशेतीनं चमकलं शेतकऱ्याचं नशीब, दरमहा कमावतोय 9 लाख रुपये

ठिपके फळकुज – या रोगामध्ये फळ कूज होऊन ते सडतात.
उपाय- बाविस्तीन 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यातून फवारावे.

Real Estate । खुशखबर! आता घरबसल्या दिसणार जमिनीचा नकाशा आणि सातबारा उताऱ्यासह रेडीरेकनरचे दर

स्ट्रॉबेरीच्या जाती

स्ट्रॉबेरीच्या केमरोजा, सेलवा, स्वीट चार्ली, रजिया, विंटरडोन, रानिया आणि कॅलिफोर्निया या जाती आहेत.

Onion Subsidy । कांदा चाळ उभारण्यासाठी सरकार देतंय 75% अनुदान, असा घ्या लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *