Tur Market Today । सध्या शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. कारण राज्यातून पाऊस गायब झाला आहे. पावसाविना पिके करपू लागली आहेत. कांद्याचे दर कमी झाले आहेत. उसाला देखील पाहिजे तसा भाव मिळत नाही. एकंदरीतच शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अशातच आता तुरीचे देखील दर (Tur Price) कमी झाले आहेत. तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजारांचा फटका बसत आहे.
PM Kisan Yojana । निवडणुकांपूर्वी सरकार देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! खात्यात येणार ‘इतके’ पैसे
मागणी जास्त आवक कमी
दरम्यान, मागणी जास्त आवक कमी असे चित्र काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले होते. त्यामुळे तुरीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत राहिली. दर वाढत असल्याने हिंगणघाट बाजार समितीत सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस १३ हजार रुपये प्रति क्विंटल भावात तुरीची खरेदी केली होती. परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये तुरीचे दर कमी (Tur Price Falls Again) झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील तुरीचा भाव १२ हजारांवर गेला आहे.
प्रति क्विंटल दोन हजार रुपयांचा फटका
सध्या तुरीची १० हजार १०० ते ११ हजार ३२५ रुपये क्विंटलच्या भावात खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजार रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, अनेक लहान व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दरात तूर खरेदी करून ती घरी आणि गोदामांमध्ये ती साठवून ठेवली आहे दरवाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या व्यापाऱ्यांनी तूर १३ हजार रुपयांवर पोहोचताक्षणी शेतमाल बाजारपेठेत आणला आहे.
त्यांना आता प्रतिक्विंटल चार ते पाच हजार रुपयांचा नफा मिळत आहे. परंतु, शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात तुरीला मोठी मागणी असते. परंतु, याच कालावधीत दर कमी झाल्याने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. हे असेच चित्र राहिले तर तूर उत्पादक शेतकरी आणखी संकटात येऊ शकतात, हे नक्कीच.
सध्या मोठ्या प्रमाणावर तुरीची खरेदी केली जात आहे त्या तुलनेत बाजारातील तुरीची आवक कमी आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये तूर उत्पादन खूप कमी आहे. अनेक शेतकऱ्यांनी गरजेपोटी तुरीची विक्री केली आहे. दरवाढीच्या अपेक्षित तूर राखून ठेवणाऱ्या शेतकर्याना आता खूप मोठा फटका बसला आहे. त्यांना कमी भावात तुरीची विक्री करावी लागणार आहे. हे दर किती दिवस कायम राहतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Success Story । भारीच! फुलशेतीनं चमकलं शेतकऱ्याचं नशीब, दरमहा कमावतोय 9 लाख रुपये