Success Story । शेतकऱ्यांना सतत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. कधी ऐन पावसाळयात पाऊस गायब असतो तर कधी पूर्वपरिस्थितीचा सामना करावा लागतो. साहजिकच यामध्ये पिकांचं खूप नुकसान सहन करावे लागते. शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा (Farmer Success Story) होत आहे.
Real Estate । खुशखबर! आता घरबसल्या दिसणार जमिनीचा नकाशा आणि सातबारा उताऱ्यासह रेडीरेकनरचे दर
अशाच एका शेतकऱ्याचे फुलशेतीनं शेतकऱ्याचं नशीब चमकल आहे. हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यातील प्रदीप सैनी असे या शेतकऱ्याचे नाव आहे, येथील शेतकरी पारंपरिक पिके न घेता बागायतीची लागवड करत आहेत. या शेतकऱ्याने रजनीगंधा या फुलाची लागवड केली आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारकडूनही फुलशेतीसाठी मदत मिळाली आहे. त्यांना शेतीसाठी उद्यान विभागाकडून अनुदान मिळाले आहे.
Fruit crop insurance । बागायतदारांसाठी आनंदाची बातमी! खात्यावर जमा झाली फळपीक विमा परताव्याची रक्कम
सरकारकडून प्रशिक्षण
खरंतर प्रदीप सैनी हे पूर्वी पारंपारिक पिके घेत होते. ते आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर भात आणि गव्हाची शेती करत होते. परंतु त्यांना जास्त खर्च येऊ लागला. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होत होते. त्यामुळे त्यांनी रजनीगंधा फुलाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे हरियाणामध्ये, सरकार शेतकऱ्यांना रजनीगंध लागवडीचे प्रशिक्षण देत आहे.
Onion Subsidy । कांदा चाळ उभारण्यासाठी सरकार देतंय 75% अनुदान, असा घ्या लाभ
लागवड
1983 पासून प्रदीप सैनी रजनीगंधाची लागवड (Rajinigandha cultivation) करत असून त्यांना काही दिवसांनंतर सरकारकडून अनुदान मिळाले. त्यामुळे त्यांच्या नफ्यात वाढ झाली. ते गाझीपूरच्या बाजारात फुले विकून दररोज 20 ते 30 हजार रुपये कमावत आहेत. एकंदरीतच प्रत्येक महिन्याला ते नऊ लाख रुपये कमावत आहेत. जर तुम्हालाही चांगली कमाई करायची असेल तर तुम्हीही या फुलाची शेती करू शकता.
Combine Harvester । पिकांच्या कापणी आणि मळणीसाठी हे मशीन आहे लै भारी! जाणून घ्या किंमत आणि खासियत
परदेशात पुरवठा
त्यांच्या प्रगावातील 250 शेतकरी कंदाची लागवड करत असून ते फुले विकून चांगली कमाई देखील करत आहे. सरकार फुलशेतीसाठी 24 हजार रुपये अनुदान देत आहे. बाजारपेठेचा विचार करायचा झाला तर रजनीगंधाला वर्षभर चांगली मागणी असते. रजनीगंधापासून औषधे आणि अत्तरे तयार करण्यात येतात. भारतातून थायलंडला पुरवठा करण्यात येतो.
Success Story । लाखोंची नोकरी सोडली पण जिद्द नाही, गाई पाळून हा पठ्ठया करतोय सहा कोटींची उलाढाल