Fruit crop insurance

Fruit crop insurance । बागायतदारांसाठी आनंदाची बातमी! खात्यावर जमा झाली फळपीक विमा परताव्याची रक्कम

Blog

Fruit crop insurance । पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिले तर बागायतदार शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल यासाठी फळ पिक विमा योजना (Crop insurance) सुरू केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हवामानातील बदलामुळे उत्पादनात घटल्याने बागायतदारांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यासाठी पीक विमा योजना राबवली जात आहे.

Onion Subsidy । कांदा चाळ उभारण्यासाठी सरकार देतंय 75% अनुदान, असा घ्या लाभ

खरंतर पारंपारिक शेती पध्दतीपेक्षा फळबागांचे महत्व वाढत चालले आहे. हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार फळांची लागवड करण्यात येत आहे. असे जरी असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे फळबागांचे नुकसान होत आहे. यात जितका नफा आहे तितका तोटादेखील आहे. दरम्यान, योजनेंतर्गत (२०२२-२३) च्या हंगामाचा परतावा ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहीर केला होता.

Combine Harvester । पिकांच्या कापणी आणि मळणीसाठी हे मशीन आहे लै भारी! जाणून घ्या किंमत आणि खासियत

किती मिळणार परतावा?

दीर्घ प्रतीक्षेनंतर परताव्याची रक्कम अखेर बागायतदार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात खात्यावर पैसे जमा झाल्याने बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यातील २६ हजार २८२ आंबा आणि ५,८३५ काजू उत्पादकांनी ३२ हजार ११७ बागायतदारांनी एकूण १७ हजार ६२२.४३ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवण्यात आला होता.

Havaman Andaj । पुढील 4 दिवस राज्याच्या ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

यापैकी काजू उत्पादक ४ हजार ५२ बागायतदारांना सात कोटी ४४ लाख ७५ हजार ९५४ रुपयांचा आणि आंबा उत्पादक २४ हजार ६१३ बागायतदारांना ७३ कोटी ७९ लाख ५२ हजार ८० रुपयांचा परतावा जाहीर करण्यात आला आहे. २४ हजार ६१३ बागायतदारांना ८१ कोटी २४ लाख १८ हजार ३४ रुपयांचा परतावा जाहीर केला होता.

Narendra Modi । शेतकऱ्यांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडणार २ हजार रुपये; जाणून घ्या तुमच्या खात्यात येणार का?

एका महिन्यात रक्कम जमा

महत्त्वाचे म्हणजे विमा कालावधी संपूनही कंपनीकडून ४५ दिवसात बागायतदारांना विमा परतावा रक्कम प्राप्त होणे अपेक्षित होते. परतावा चार महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहीर केला होता. परंतु परतावा जाहीर करून एक महिन्यानंतर परताव्याची रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा झाली आहे. त्यामुळे बागायतदारांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Success Story । लाखोंची नोकरी सोडली पण जिद्द नाही, गाई पाळून हा पठ्ठया करतोय सहा कोटींची उलाढाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *