Narendra Modi

Narendra Modi । शेतकऱ्यांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडणार २ हजार रुपये; जाणून घ्या तुमच्या खात्यात येणार का?

शासकीय योजना

Narendra Modi । शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) सुरुवात केली आहे. ज्याचा लाभ देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. परंतु जर शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. या योजनेचे (PM Kisan Samman Nidhi Yojana) आतापर्यंत 14 हप्ते जारी करण्यात आले आहेत. शेतकरी आता पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. आज या योजनेचा हप्ता जमा होणार आहे.

Havaman Andaj । पुढील 4 दिवस राज्याच्या ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक वर्षी 6,000 रुपये पाठवण्यात येतात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. दरम्यान, या योजनेचा 15 वा हप्ता जारी करण्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमधील खुंटी येथील बिरसा कॉलेजमध्ये उपस्थित राहणार आहेत. अहवालानुसार, नरेंद्र मोदी एका बटणावर क्लिक करून 15 वा हप्ता म्हणून 8.0 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जारी करणार आहेत.

Success Story । लाखोंची नोकरी सोडली पण जिद्द नाही, गाई पाळून हा पठ्ठया करतोय सहा कोटींची उलाढाल

अहवालानुसार, या योजनेच्या प्रारंभापासून लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रान्सफर केलेली एकूण रक्कम 2.80 लाख कोटी रुपयांच्या आकड्यापेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी आणि इतर आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यास मदत करू शकते. प्रत्येक चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये डीबीटी मोडद्वारे देशभरातील शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांत प्रत्येक वर्षी 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ ट्रान्सफर करण्यात येतो. आतापर्यंत, देशभरातील 11 कोटींपेक्षा जास्त शेतकर्‍यांना 2.61 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे लाभ दिले आहेत.

PMFME Scheme । शेतकऱ्यांनो, सोडू नका ही संधी! अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मिळत आहे १० लाख ते ३ कोटींपर्यंतचे अनुदान

अशी तपासा रक्कम

  • रक्कम पाहण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • पुढे होम पेज वर “लाभार्थी स्टेटस” वर क्लिक करा.
  • आता तुमचा मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाका.
  • त्यानंतर शेतकरी “Get Data” वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमच्या खात्याच्या स्थितीबद्दल माहिती मिळेल.

Government Schemes । लवकरच राज्यात होणार १० लाख विहिरी आणि ७ लाख शेततळी, त्वरित करा ग्रामपंचायतीकडे अर्ज

असे व्हा सहभागी

नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी 11:30 वाजता झारखंडमधील खुंटी येथून योजनेचा निधी ट्रान्सफर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या टेलिकास्टमध्ये सामील होण्यासाठी तुम्ही pmevents.ncog.gov.in वर जाऊन देखील नोंदणी करू शकता. तसेच या योजनेशी निगडित जास्त माहितीसाठी शेतकरी बांधव https://pmkisan.gov.in/ या अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात. इतकेच नाही तर तुम्ही pmkisan-ict@gov.in वर देखील ईमेल पाठवू शकता.

Success Story । ‘या’ सरकारी योजनेनं बदललं ट्रॅक्टर चालकाचे जीवन, बनला राईस मिलचा मालक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *