Cotton Rate

Cotton rate । कापसाच्या भावात मोठी घसरण, पाहा किती मिळतोय दर?

Blog

Cotton rate । सध्या शेतकरी चांगलेच अडचणीत सापडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कांद्यापाटोपाठ आता कापसाचे देखील दर कोसळले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. पांढरे सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला खूप कमी भाव मिळत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अधिक निघणे देखील मुश्किल झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभा राहिले आहे. एकीकडे कापसाचे दर कोसळले आहेत आणि दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. (Cotton rate today)

Land Record । ‘ही’ पद्धत वापरून जमिनीचे जुने कागदपत्र काढा! कसे ते जाणून घ्या…

शेतकरी रात्रंदिवस शेतीत काबाडकष्ट करतात आपला कापूस पिकवतात, त्याला रोगांपासून वाचवतात आणि ज्यावेळी कापूस विक्रीसाठी येतो त्यावेळेस त्याचे भाव कोसळतात. असा अनेक वर्षांपासूनचा अनुभव शेतकऱ्यांना येतोय. शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना व्यापारी देखील विविध कारणे देत भाव कमी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यावेळी शेतकरी आपला कापूस बाजार समितीत विकण्यास नेतात त्यावेळी तो कापूस ओला आहे, कापूस काळा पडला आहे, कापूस गरम आहे इत्यादी कारणे व्यापारी शेतकऱ्यांना देत असल्याचा आरोप केला जात आहे.

Land Record । ‘ही’ पद्धत वापरून जमिनीचे जुने कागदपत्र काढा! कसे ते जाणून घ्या…

मागच्या वर्षीच्या कापूस दराबद्दल आपण पाहिले तर मागच्या वर्षी सुरुवातीला कापसाला कमी दर मिळाला होता. मात्र त्यानंतर कापसाला ९००० ते ९५०० क्विंटल पर्यंत दर मिळाला. असाच काही भाव यावर्षी देखील मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी यंदाच्या वर्षी देखील कापसाची लागवड केली. मात्र यंदाच्या वर्षी चित्र काही उलट दिसत आहे. यावर्षी कापसाला कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

Onion Farmer । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, केंद्रानं घेतला महत्वाचा निर्णय

किती मिळतोय कापसाला बाजार?

कापसाच्या भावाबद्दल आपण पाहिले तर ऑक्टोबर महिन्यात कापूस सुरू झाला असून त्यावेळी कापसाला ७३०० पर्यंत भाव मिळत होता मात्र सध्या कापसाचे भाव कमी झाले असून ६००० ते ६५०० रुपये क्विंटल वर भाव आला आहे. मागील दोन महिन्याचा विचार केला तर कापसाचे दर जवळपास 500 रुपयांनी घसरले आहेत.

Urea Subsidy । अशाप्रकारे मिळते युरिया खतासाठी अनुदान, जाणून घ्या सविस्तर

सध्याची परिस्थिती पाहिली तर खते, बियाणे महाग झाली आहेत त्यातूनही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही. आधीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामध्येच आता कापसाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकरी चांगलेच आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Brinjal Rate । वांग्याच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचे दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *