Urea Subsidy

Urea Subsidy । अशाप्रकारे मिळते युरिया खतासाठी अनुदान, जाणून घ्या सविस्तर

शासकीय योजना

Urea Subsidy । शेती भारतात मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. शेतकरी आता शेतीत पारंपरिक पिके न घेता आधुनिक पिके (Modern crops) घेत आहेत. ज्याचा त्यांना फायदा होत आहे. पिके चांगल्या प्रकारे यावीत, यासाठी शेतकरी युरिया खताचा (Urea fertilizer) वापर करतात. युरियामुळे मातीमधील आवश्यक पोषकतत्वांची कमतरता भरून पिकांची वाढ चांगली होते.

Brinjal Rate । वांग्याच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचे दर

महत्त्वाचे म्हणजे सरकारकडून युरिया खतावर अनुदान (Subsidy on Urea Fertilizer) देण्यात येते. परंतु, याची अनेकांना माहिती नसते. त्यामुळे त्यांना याचा लाभ घेता येत नाही. सरकारी अनुदान (Government Subsidy) मिळाल्यानंतर युरिया खताची एक गोणी किती रुपयांना मिळेल, जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

Electric Bike । भारीच की राव! मालवाहतूक करणारी इलेक्ट्रिक बाईक, किंमतही आहे खूपच कमी

किती मिळते अनुदान?

केंद्र सरकार (Central Govt) रासायनिक खतांसाठी (Chemical fertilizers) अनुदान देते. परंतु, हे लक्षात घ्या की हे अनुदान थेट शेतकऱ्यांना मिळत नाही. रासायनिक खते उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना अनुदान मिळते. थेट कंपनीतून येणाऱ्या युरिया खताच्या ४५ किलोच्या गोणीचा विचारकरायचा झाल्यास ती 2236.37 रुपयांना मिळते. अनुदानामुळे गोणी शेतकऱ्यांना दुकानदारांमार्फत 266.50 रुपयांना मिळते.

Milk Subsidy । दूध दराबाबत राधाकृष्ण विखे-पाटलांनी केली सर्वात मोठी घोषणा

म्हणजेच 1969.87 रुपये प्रति युरिया गोणी अनुदान कंपन्यांना दिले जाते. खरीप हंगाम असो की रब्बी हंगाम, शेतकऱ्यांना सर्वात जास्त युरियाची गरज असते. शेतात युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेता सरकारकडून कंपन्यांना अनुदान देण्यात येते. ही गोणी शेतकऱ्यांना 266 रुपयांमध्ये युरियाची गोणी उपलब्ध होते.

Eknath Shinde । कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांंसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

देशव्यापी अनुदान योजना

महत्त्वाचे म्हणजे यासाठी सरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येते. यंदा अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीच्या रासायनिक खतांच्या अनुदानासाठी 1.75 लाख कोटींची तरतूद केली आहे. सरकारची ही देशव्यापी अनुदान योजना आहे. ज्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. शेतकऱ्यांची सतत हजारो रुपयांची बचत होत आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; या राज्यांना झोडपून काढणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *