Maha e-Gram Citizen App

Maha e-Gram Citizen App । आता दाखल्यासाठी जावे लागणार नाही ग्रामपंचायतीत, एकाच क्लिकवर घरबसल्या मिळतील दाखले

शासकीय योजना

Maha e-Gram Citizen App । पीएम विश्वकर्मा, ई-श्रमकार्ड, महात्मा फुले योजना, जन्म व मृत्यू प्रमाणपत्र आणि दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र अशा विविध दाखल्यांची गरज आपल्याला असते. जर हे दाखले (Certificates) नसतील तर अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. पूर्वी हे दाखले काढण्यासाठी ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) जावे लागत असे. परंतु, नागरिकांना अनेक अडचणी यायच्या.

Sugarcane Crop । करा ‘या’ पद्धतीने उसाची लागवड! एकरी मिळेल 80 ते 150 टन उत्पन्न

आता तुम्हाला या दाखल्यांसाठी ग्रामपंचायतीत जावे लागणार नाही. कारण आता तुम्ही घरी बसून दाखले काढू शकता. यासाठी महा ई-ग्राम सिटिझन अॅप (Maha e-Gram Citizen) तयार करण्यात आले आहे. मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात अॅपवरून तब्बल ७९ हजार ९० लोकांनी दाखले काढले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामार्फत महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचे एक अॅप्लिकेशन (Maha e-Gram Citizen Application) उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! या राज्यांमध्ये दाट धुके राहणार, हवामान खराब होण्याची शक्यता; 10 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी पाऊसही पडणार

महत्त्वाचे म्हणजे ही सुविधा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ग्रामपंचायतींत उपलब्ध करून दिली आहे. यातून नागरिकांना वर्षभरात विविध कागदपत्रे काढता येत आहेत. ग्रामपंचायतीला गृहकर वसूल करणे फायदेशीर (Maha e-Gram Citizen Application Benefits) झाले आहे. यामुळे आता ग्रामपंचायतीला गृहकर वसुल करताना कोणत्याही अडचणी येणार नाही. ग्रामपंचायतीचे काम सोयीस्कर झाले आहे.

Onion Export Ban । शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका! सरकारनं घातली कांद्याच्या निर्यातीवर बंदी

असे करा इन्स्टॉल

प्ले स्टोअरमधून महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट हे अॅप इन्स्टॉल करून अॅप ओपन करा. ओपन केल्यानंतर रजिस्टर करा. यात आपले नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी यासारखी सर्व माहिती काळजीपूर्वक भर. मिळालेल्या युजर पासवर्ड द्वारे लॉगिन करा.

Neera Deoghar Project । शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पहिल्यांदाच बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे मिळणार पाणी

मिळणार हे दाखले

अॅपच्या मदतीने नागरिकांना आता घरबसल्या दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र, जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, पीएम विश्वकर्मा, ई-श्रमकार्ड, महात्मा फुले योजना, भारत ग्रामपंचायत स्तरावरून मिळणारे विविध दाखले, योजनांच्या लाभासाठी कागदपत्रे या अॅपवरून मिळतील.

Success Story । नोकरी नाही तर फुलशेती करून उच्च शिक्षित तरुणाने कमावलं लाखो रुपये, असं केलं नियोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *