Marathwada Drought Survey

Marathwada Drought Survey । बिग ब्रेकिंग! ‘या’ तारखेला दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार मराठवाड्यात

बातम्या

Marathwada Drought Survey । यावर्षी पावसाने (Rain in India) देशातील काही भागात पाठ फिरवली आहे. पावसाअभावी पिके करपून गेली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तर काही ठिकाणी खरीप हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ (Heavy Rain) घातला आहे. सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडत आहे, या दिवसातच पाण्याची टंचाई (Water scarcity) जाणवू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.

Maha e-Gram Citizen App । आता दाखल्यासाठी जावे लागणार नाही ग्रामपंचायतीत, एकाच क्लिकवर घरबसल्या मिळतील दाखले

‘या’ तारखेला करणार पाहणी

मराठवाड्यातदेखील (Marathwada) यंदा अपेक्षित पाऊस पडला नाही. यामुळे येथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता येथील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. मराठवाड्यात दुष्काळ (Marathwada Drought) पाहणीसाठी केंद्रीय पथक (Central Squad) दाखल होणार आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांची म्हणजे छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्याची पाहणी 13 व 14 डिसेंबर रोजी (Marathwada Drought Survey Date) होणार आहे.

Sugarcane Crop । करा ‘या’ पद्धतीने उसाची लागवड! एकरी मिळेल 80 ते 150 टन उत्पन्न

पुण्यात पाहणी केल्यानंतर 15 डिसेंबर रोजी पथक बैठक घेऊन अहवाल केंद्र सरकारला देणार आहे. केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन (Priya Rajan) या पथकप्रमुख असतील, त्यांच्या नेतृत्वात चार पथक तयार केली आहेत. यावर्षी मराठवाड्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही, त्यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! या राज्यांमध्ये दाट धुके राहणार, हवामान खराब होण्याची शक्यता; 10 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी पाऊसही पडणार

शेतकऱ्यांना कोणती मदत मिळणार?

पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. अशात काही पिकांचे अवकाळी पावसामुळे खूप नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारप्रमाणे केंद्र सरकराने मदत करावी, अशी मागणी केली जात होती. अशातच आता केंद्रीय पथक मराठवाड्यातील जिल्ह्यांचा दौरा करून नुकसानीची पाहणी करेल. दरम्यान, दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना कोणती मदत मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Onion Export Ban । शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका! सरकारनं घातली कांद्याच्या निर्यातीवर बंदी

सुप्रिया सुळेंनी केली होती मागणी

सर्वात महत्त्वाचे म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी हिवाळी अधिवेशनात केंद्रीय पथकाने तातडीने महाराष्ट्रात जाऊन पाहणी करावी. महाराष्ट्राला केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी केली होती. आता केंद्रीय कृषी मंत्रालयाचे एकूण 12 सदस्य असणारे पथक राज्यातील दुष्काळ आणि खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्यातील जिल्ह्याचा दौरा करणार आहे.

Neera Deoghar Project । शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पहिल्यांदाच बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे मिळणार पाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *