Onion Rate । कांद्याने (Onion) यावर्षी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. शेतकरी दरवर्षी कांद्याला भाव (Onion Rate) असो किंवा नसो मोठ्या प्रमाणात लागवड (Onion Cultivation) करतात. यावर्षी पावसामुळे कांद्याची खूप नासाडी झाली आहे. असे असूनही कांद्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. याउलट अजूनही कांद्याचे दर (Onion price falls down) खूप पडले आहेत. राज्यातील लाखो कांदा उत्पादकांना कांदा कवडीमोल दरात (Onion price) विकावा लागत आहे.
अशातच कांदा निर्यात बंदी (Onion export ban) 31 मार्च 2024 पर्यंत राहणार असून केंद्र सरकारने (Central Govt) याबाबत एक परिपत्रक काढलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. या निर्णयानंतर मनमाड, लासलगाव, नांदगावसह बहुतांश बाजार समित्यात कांद्याचे लिलाव (Onion auction) बंद झाले आहेत. शेतकरी आणि कांदा व्यापारी कमालीचे नाराज झाले आहे.
‘या’ दराने होतेय पाकिस्तानात कांद्याची विक्री
अशातच पाकिस्तानात कांद्याचे दर (Onion rate in Pakistan) गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानात एक किलो कांद्यासाठी 130 ते 140 रुपये मोजावे लागत आहे. शिवाय पाकिस्तानातील काही शहरांत कांद्याचे दर हे 145 रुपयांच्यावर (Onion Price hike in Pakistan) गेले आहेत. या किमती जाणून तुम्हालाही धक्का बसला असेल. भारतीय बाजारापेक्षा जास्त दराने पाकिस्तानमध्ये कांद्याची विक्री केली जात आहे.
Sugarcane Crop । करा ‘या’ पद्धतीने उसाची लागवड! एकरी मिळेल 80 ते 150 टन उत्पन्न
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
केंद्र सरकारने या निर्णयापूर्वी ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरानेत कांदा देण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनावेळी आर्थिक मदतीची अपेक्षा होती, परंतु, त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. ठीक-ठिकाणी कांदा उत्पादकांची आंदोलनं सुरु आहेत.
भारतात उत्पादित होणारा कांदा विविध देशांत निर्यात करतात. खास करून परदेशात खूप मागणी आहे. बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे तीन प्रमुख कांद्याचे आयातदार देश आहेत. सरकारच्या निर्णयामुळे निर्यातीवर परिणाम होईल. केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक रस्त्यावरती दिसेल, असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.
Onion Export Ban । शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका! सरकारनं घातली कांद्याच्या निर्यातीवर बंदी