Onion Crop Management

Onion Crop Management । कांद्यावरील सर्वात घातक रोगाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? अशाप्रकारे करा नियोजन नाहीतर होईल मोठे नुकसान

बातम्या

Onion Crop Management । सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. सगळीकडे कडाक्याची थंडी पडल्याचे जाणवत आहे. हा ऋतू काही पिकांसाठी खूप फायदेशीर आहे पण काही पिकांना थंडीचा फटका बसतो. कांद्याच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर करपा हा रोग पडतो. कांद्यासाठी (Onion Crop) हा रोग सर्वात घातक रोग आहे. जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. नुकसानापासून वाचायचे असेल तर उपाययोजना करणे गरजेचे आहे. (Onion crop cultivation)

Success Story । काकडीच्या लागवडीतून शेतकरी श्रीमंत, एक एकर काकडीतून मिळाले दोन लाख रुपये

कांदा हे पीक राज्यातील महत्त्वाचे आणि मुख्य पीक आहे. दरवर्षी बाजारभाव असो वा नसो शेतकरी त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड (Onion cultivation) करतात. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात कांद्याची लागवड करता येते. नैसर्गिक बदलांमुळे मागील काही वर्षात कांद्यावर रोग पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. करप्याचे देखील प्रकार आहेत.

Soybean rates । सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त, हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन केले आंदोलन

अल्टरनेरिया करपा

खरीप हंगामातील दमट, ढगाळ तसेच पावसाळी वातावरणामुळे अल्टरनेरिया करपा (Alternaria carpa) रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर होतो. या रोगाच्या सुरुवातीला कांद्याच्या पातीवर लहान, खोलगट असे पांढरे चट्टे पडतात. प्रथम शेंड्याकडून होऊन खालच्या भागाकडे सरकत जाते. या रोगामुळे कांदा चाळीत देखील टिकत नाही.

Milk Subsidy । मोठी बातमी! अखेर दूध अनुदानाचा शासन जीआर आला, ‘या’ असतील अटी; वाचा संपूर्ण माहिती

स्टेम्फीलीयम करपा

हा तपकिरी करपा (Stemphyllium karpa) म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामात याचा जास्त प्रादुर्भाव दिसतो. याचा प्रादुर्भाव होतो त्यावेळी पानावर तपकिरी चट्टे पडतात आणि या चट्ट्यांचे प्रमाण बुंध्याकडून शेंड्याकडे वाढत जाते. पाने तपकिरी पडून वाळायला लागतात.

CIBIL Score । शेतकऱ्यांना सुध्दा कर्जासाठी Cibil Score महत्त्वाचा असतो? जाणून घ्या नियम

कोलीटोट्रीकम करपा

याला काळा करपा रोग असे म्हणतात. खरीप हंगामामध्ये प्रादुर्भाव दिसून येतो. रोगाचा प्रादुर्भाव झाला तर सुरुवातीला पानावर आणि मानेवर वर्तुळाकार काळे डाग पडायला लागतात. जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. पाने करपून कांदा सडतो.

Krushi Batmya । आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार 3 हेक्टरपर्यंत पैसे, सरकारने केले परिपत्रक जारी

जाणून घ्या उपाययोजना

करपा रोग पडू नये म्हणून तुम्ही पेरणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी काही उपाययोजना करू शकता. तसेच रोपवाटिका नियोजन आणि लागवडीनंतरचे नियोजन म्हणजे औषध फवारणी वगैरे तुम्ही करू शकता. यामुळे करपा रोग नियंत्रणात येऊन चांगले उत्पन्न मिळेल.

Success story । तरुण शेतकऱ्यानं कर्ज घेतले आणि सुरु केली स्वत:ची कंपनी, होतेय 3 कोटींची उलाढाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *