Soybean rates

Soybean rates । सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त, हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन केले आंदोलन

बाजारभाव

Soybean rates । शेतकरी यंदा अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कारण यंदा जवळपास सर्वच भाज्यांचे दर कमालीचे घसरले (Vegetable rates falls down) आहे. भाज्यांच्या विक्रीतून उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि मजुरांचा खर्च देखील निघणे अवघड झाले आहे. साहजिकच अनेक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. भाजीपाल्यांचे दर (Vegetable rates) कमी झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

Milk Subsidy । मोठी बातमी! अखेर दूध अनुदानाचा शासन जीआर आला, ‘या’ असतील अटी; वाचा संपूर्ण माहिती

काही शेतकरी आर्थिक संकट आल्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत. दरम्यान, सोयाबीन हे राज्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कारण हे पीक कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देते. त्यामुळे राज्यात त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. परंतु यंदा याउलट चित्र पाहायला मिळत आहे. यंदा सोयाबीनचे दर खूप घसरले आहेत. (Soybean rates falls down)

CIBIL Score । शेतकऱ्यांना सुध्दा कर्जासाठी Cibil Score महत्त्वाचा असतो? जाणून घ्या नियम

हातात कोयता आणि पिस्तूल घेत आंदोलन

सोयाबीनला योग्य हमीभाव नसल्याने शेतकरी चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीनला प्रती क्विंटल 6 हजार रुपये दर मिळावे, अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकरी करत आहेत. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर बुलढाणा येथील एका शेतकऱ्याने चक्क हातात कोयता आणि पिस्तूल घेत आंदोलन केले, यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण झाले होते.

Success Story । सेंद्रिय गुळाच्या माध्यमातून यशाला गवसणी! तरुण शेतकरी वर्षाला करतोय 8 ते 9 लाखांची कमाई

रवी महानकार असे या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचं नाव आहे. हा शेतकरी अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा या गावातील रहिवासी आहे. या शेतकऱ्याने आतापर्यंत 100 क्विंटल सोयाबीन विकली असून मिळालेला मोबदला हा खूप कमी आहे. त्यामुळे त्याचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याने विक्रीला आणलेली सोयाबीन रस्त्यावर फेकून या सरकारचा निषेध व्यक्त केला.

Onion Export । मोठी बातमी! भारताकडे इंडोनेशियाने केली 900,000 टन कांदा निर्यात करण्याची मागणी

पोलिसांनी केली अटक

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल होत या शेतकऱ्याला त्यांनी ताब्यात घेतले. यंदा राज्यात 50 लाख 85 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली होती. परंतु सुरुवातीलाच पाऊस एक महिना उशिरा आला. त्यानंतर येलो मोझॅक नावाचा बुरशीजन्य रोग सोयाबीनवर पडला.त्यामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन निम्म्याने कमी झाले आहे.

Scheme for Wine Industry । वाइन उद्योगास मिळणार प्रोत्साहन, सरकारने सुरु केली खास योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *