Milk Subsidy

Milk Subsidy । मोठी बातमी! अखेर दूध अनुदानाचा शासन जीआर आला, ‘या’ असतील अटी; वाचा संपूर्ण माहिती

पशुसंवर्धन

Milk Subsidy । अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. यामधून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो. परंतु, यंदा हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कारण यंदा दुधाचे दर (Milk rate) कमालीचे घसरले आहेत. शिवाय पावसाअभावी पिके जळून गेली आहेत. पिके जळाल्याने चारा खूप महाग झाला आहे. शेतकरी सरकारकडे मदतीची विनंती करत आहेत.

CIBIL Score । शेतकऱ्यांना सुध्दा कर्जासाठी Cibil Score महत्त्वाचा असतो? जाणून घ्या नियम

पशुपालकांना दिलासा देण्यासाठी मागील आठवड्यात पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाकडून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान (Milk Subsidy) देण्याची घोषणा केली होती. परंतु, याबाबत जीआर काढण्यात आला नव्हता. याच मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पशुपालकांसाठी आनंदाची बातमी आहे.

Success Story । सेंद्रिय गुळाच्या माध्यमातून यशाला गवसणी! तरुण शेतकरी वर्षाला करतोय 8 ते 9 लाखांची कमाई

अनुदानाचा जीआर जारी

कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाकडून जीआर जारी करण्यात आला आहे. राज्य दूध उत्पादक संघांनी शेतकऱ्यांच्या 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणवत्तेच्या गाईच्या दुधाला 27 रुपये प्रति लिटर दर देणे असेल. दूध उत्पादक शेतकऱ्यांना घोषित सरकारी अनुदान 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी मिळेल, असे या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, 1 जानेवारी 2024 पासून पुढील दोन महिन्यासाठी दूध अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मंत्री विखे पाटील यांनी केली होती. असे असूनही आता जीआरमध्ये दूध अनुदानासाठीच्या कालावधीमध्ये घट केली आहे. सरकारकडून पुढील निर्णयानंतर हा कालावधी वाढवण्याची शक्यता आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संघांनी 27 रुपये प्रति लिटर दर देणे बंधनकारक असेल, असे जीआरमध्ये म्हटले आहे.

Onion Export । मोठी बातमी! भारताकडे इंडोनेशियाने केली 900,000 टन कांदा निर्यात करण्याची मागणी

जाणून घ्या अटी

शेतकऱ्यांना थेट मदत हस्तांतरण (डीबीटी) योजनेद्वारे अनुदानाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बँक खाते आणि पशुधनाच्या आधार कार्डशी जोडलेले असावे. शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाचे इअर टॅगिंग करावे लागेल. जिल्हा दुग्धविकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त समिती मार्फत याची पडताळणी करून महिन्यातून तीन वेळा 10 दिवसांच्या अंतराने थेट त्यांच्या खात्यात जमा होईल.

Scheme for Wine Industry । वाइन उद्योगास मिळणार प्रोत्साहन, सरकारने सुरु केली खास योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *