CIBIL Score । शेतकऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. काही शेतकरी कृषी कर्ज (Agri Loan) घेतात. कमी व्याजदर देणाऱ्या बँकेकडून शेतकरी कर्ज (Bank loan) घेण्यास प्राधान्य देतात. परंतु काही शेतकरी कर्जाची परतफेड न करता आल्याने टोकाचा निर्णय घेतात. परंतु, कृषी कर्जासाठी CIBIL स्कोर (CIBIL Score for Loan) महत्त्वाचा असतो का? असा प्रश्न अनेकांना पडतो.
काय आहे CIBIL स्कोअर?
CIBIL स्कोअर म्हणजे कर्ज (Loan) घेणाऱ्या व्यक्तीचा हा एक प्रकारचा क्रेडिट इतिहास होय. शेतकरी कर्ज (Agriculture Loan) घेण्यासाठी सर्वात अगोदर बँक त्याचा क्रेडिट स्कोअर तपासत असते. शेतकर्यावर आधीच कर्ज असेल तर तो वेळेवर हप्ते भरण्यास सक्षम आहे की नाही हे बँक पाहते. अशा व्यक्तींचा क्रेडिट स्कोअर (Credit score) 300 ते 900 च्या दरम्यान असतो.
Onion Export । मोठी बातमी! भारताकडे इंडोनेशियाने केली 900,000 टन कांदा निर्यात करण्याची मागणी
बँका वैयक्तिक कर्ज किंवा गृहकर्ज घेतानाच CIBIL स्कोअर तपासत असतात. तसेच कृषी कर्ज घेताना बँक कर्ज देण्यापूर्वी शेतकऱ्याचा सिबिल स्कोअर तपासत असते. ही बाब अनेकांना माहिती नाही. त्यामुळे कर्ज घेण्यासाठी तुमचा CIBIL स्कोर चांगला असावा. नाहीतर बँक तुम्हाला कर्ज देणार नाही. हे लक्षात घ्या की बँक 750 किंवा त्यापेक्षा जास्त CIBIL स्कोअर असेल तर लगेचच कर्ज देते.
Scheme for Wine Industry । वाइन उद्योगास मिळणार प्रोत्साहन, सरकारने सुरु केली खास योजना
कृषी कर्ज देण्यापूर्वी बँक सर्वात अगोदर शेतकऱ्याचे वय पाहते. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याचे वय कमीत कमी १८ वर्षे असावे. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असावा. शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी. त्यांच्याकडे जमिनीच्या मालकीचा पुरावा आणि उत्पन्नाचा पुरावा असावा. बँक कर्ज देण्यापूर्वी शेतकऱ्याचे उत्पन्न पाहते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बँक अर्जावर निर्णय घेते.
Success story । तरुण शेतकऱ्यानं कर्ज घेतले आणि सुरु केली स्वत:ची कंपनी, होतेय 3 कोटींची उलाढाल
लक्षात ठेवा ही गोष्ट
समजा तुम्ही कर्जाचा EMI चुकवला किंवा बिल प्रलंबित केला असल्यास त्याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होतो. असे झाले की तुमचा स्कोअर कमी होतो. तुम्ही क्रेडिट कार्डने खर्च केला आणि वेळेवर बिल भरलं नसल्यास तरी त्याचा स्कोअरवर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे चुकूनही ही चूक करू नका. तुमच्या स्कोअरवर त्याचा परिणाम होईल.
Krushi Batmya । आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार 3 हेक्टरपर्यंत पैसे, सरकारने केले परिपत्रक जारी