Success story । जर मनात जिद्द आणि प्रचंड मेहनत करण्याची ताकद असेल तर साहजिकच यशापासून आपल्याला कोणीही अडवत नाही. आज भारतात आधुनिक पद्धतीने शेती (Modern Farming) केली जात आहे. शेतीत विविध प्रयोग केले जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तरुणवर्गाने देखील शेतीचे महत्त्व (Importance of agriculture) समजून शेती करण्यास सुरुवात केली आहे. शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Krushi Batmya । आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार 3 हेक्टरपर्यंत पैसे, सरकारने केले परिपत्रक जारी
अशाच एका तरुण शेतकऱ्याने 5 लाखांचं कर्ज (Agriculture Loan) घेत आज स्वत:ची कंपनी उभा केली आहे. त्यातून ते आज 3 कोटींची उलाढाल करत आहेत. या तरुण शेतकऱ्याने जिद्द आणि मेहनतीचे जोरावर ही कामगिरी केली आहे. योगेश गावंडे (Yogesh Gawande) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. या कंपनीत ते सध्या 100 लोकांना रोजगार देत आहेत.
Sugarcane Labor Unions । उसतोड मजुरांसाठी आनंदाची बातमी! उसतोडणी दरात झाली ३४ टक्क्यांची वाढ
..त्यामुळे घेतला कंपनी स्थापन करण्याचा निर्णय
योगेश गावंडे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. 2015 मध्ये त्यांच्या लहान भावाला कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबासह फवारणी यंत्र बनवण्याचे ठरवले. 2017 मध्ये ते भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या (BYST) संपर्कात आले आणि त्यानंतर त्यांना आपले ध्येय बळकट करण्याचा मार्ग सापडला.
Havaman Andaj । महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट! जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
त्यांनी बीवायएसटीच्या मदतीने साडेपाच लाखांचे कर्ज घेतले. मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात स्प्रे पंपचा प्रोटोटाइप विकसित केला होता. त्यासाठी त्यांचा सन्मान देखील केला होता. त्यानंतर त्यांनी निओ फॉर्मटेक नावाची कंपनी (Neo Formtech Company) स्थापन केली. हा चाकांवरचा स्प्रे पंप बॅटरीवर चालत असून तो अपंग शेतकरी किंवा पाय, हात गमावलेल्यांसाठी हा स्प्रे पंप खूप फायद्याचा आहे.
Cabinet Meeting । दुधाच्या ५ रुपये अनुदानाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय!
होतेय 3 कोटींची उलाढाल
स्प्रे पंपला शरीरावर वाहून नेण्याची गरज नसते. तो एकाच वेळी 4 फवारणी पाईप चालवता येतो. हा स्प्रे पंप हाताने किंवा बॅटरीनेही चालवता येतो. त्यांनी 2019 पासून आतापर्यंत 5 हजार फवारणी पंपांची विक्री केली आहे. इतकेच नाही तर त्यांनी भारतातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना स्प्रे पंप पुरवणाऱ्या केनियातील कंपनी सिनी काकू अॅग्रोसोबत करार केला असून सॅम्पल स्प्रे पंप पाठवले आहेत. त्यांना 150 फवारणी पंपांची ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे.
Government schemes । खुशखबर! लहान शेतकऱ्यांनाही मिळेल तलाव खोदण्यासाठी अनुदान, असा करा अर्ज