Government schemes

Government schemes । खुशखबर! लहान शेतकऱ्यांनाही मिळेल तलाव खोदण्यासाठी अनुदान, असा करा अर्ज

शासकीय योजना

Government schemes । निसर्गाच्या लहरीपणामुळे (Vagaries of nature) शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. साहजिकच शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. देशात दरवर्षी कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत. आणि दरवर्षी या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकार योजना (State Govt Scheme) सुरु करत असते. ज्याचा लाखो शेतकरी लाभ घेत आहेत.

Cabinet Meeting । दुधाच्या ५ रुपये अनुदानाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय!

यापैकी एक योजना म्हणजे तलाव अनुदान योजना (Pond Subsidy Scheme) होय, देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाळ्याच्या दिवसातच भूजल पातळीत घट होत आहे. शेतकऱ्यांसाठी ही गंभीर समस्या बनत चालली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पिके जळून जात आहेत. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी तलाव खोदण्याची योजना (Pond Subsidy) सुरू केली आहे.

Eicher 188 Tractor । उत्तम मायलेज आयशर 188 ट्रॅक्टर 3 लाखांच्या रेंजमध्ये; जाणून घ्या वैशिष्ट्ये

या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना २६ हजार रुपये अनुदानाच्या स्वरूपात देत आहे. या योजनेचा लाभ (Pond Subsidy Benefits) घेऊन शेतकरी आपल्या शेतात तलाव बांधून पाण्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकतात. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचनासाठी तलाव खोदता येईल. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना तलावात माशांची शेती करून अतिरिक्त उत्पन्नही मिळू शकते. त्यामुळे ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

Mahanand Dairy । महानंद वाचवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावे, किसान सभेचा इशारा

कोणाला घेता येणार लाभ?

या सरकारी योजनेचा लाभ सर्व लहान शेतकरी घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील एससी-एसटी, अल्पसंख्याक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश केला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदार शेतकऱ्याकडे काही कागदपत्रे असणे बंधनकारक असणार आहे.

Farmer success story । जिद्दीला सलाम! 10 बाय 20 च्या झोपडीत केली मशरुमची शेती, कसं केलं नियोजन

आवश्यक कागदपत्रे

योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे तपशील आणि आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक आणि शेतीची कागदपत्रे असावीत.

Kisan Credit Card । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मिळणार 5.50 लाख कोटी रुपये

किती असेल तलावाचा आकार?

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात 600 घनमीटर म्हणजेच 20 मीटर रुंद, 10 मीटर लांब आणि 3 मीटर खोल तलाव बांधता येईल. यासाठी शेतकऱ्याकडे कमीत कमी अर्धा हेक्टर जमीन असावी लागते. लाभ घेण्यासाठी तुम्ही ई-मित्राद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर कागदपत्राची हार्ड कॉपी कृषी विभागाच्या कार्यालयात जमा करावी लागेल.

Agriculture Technology । मशागतीचा खर्च परवडेना, शेतकऱ्याने केले भन्नाट जुगाड; दुचाकीच्या जुगाडातून शोधला पर्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *