Kisan Credit Card । सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Government schemes) सुरु करत असते. ज्याचा लाभ देशातील लाखो शेतकऱ्यांना होत आहे. परंतु, असेही काही शेतकरी आहेत, त्यांना या सरकारी योजनाबद्दल कोणतीच माहिती नसते. त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. आर्थिक संकट आल्याने शेतकऱ्यांना कर्ज (Loan) काढावे लागते. याच शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे.
किसान क्रेडिट कार्ड अर्थात केसीसीद्वारे (KCC) देशभरातील शेतकऱ्यांना 5.50 लाख कोटींचा कर्जनिधी मिळणार आहे. आतापर्यंत 2023 या वर्षभरात केंद्र सरकारकडून 451.98 लाख नवीन किसान क्रेडिट कार्ड (KCC scheme) मंजूर केले आहे. आता या सर्व कार्डचे क्रेडिट लिमिट 5 लाख 51 हजार 101 कोटी रुपये आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही महत्त्वाची समोर आली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Scheme) सुरु केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज देण्याची तरतूद आहे. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. वय वर्ष ७५ पर्यंतचे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात.शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 7 टक्के व्याजदराने शेतीसाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
Ethanol Subsidy । केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल निर्मितीसाठी मिळणार अनुदान
त्याशिवाय पशुपालन आणि मस्त्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत 2 लाखांपर्यंचे कर्ज मिळते. केंद्राने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कोरोना काळात 2.5 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटपाचे लक्ष्य निर्धारित केले होते. हे लक्ष्य केंद्र सरकारकडून 15 ऑक्टोबर 2021 पर्यंतच पूर्ण केले होते. केंद्राकडून 2 लाख कोटींच्या क्रेडिट लिमिटचे कार्ड बनवण्याचे निश्चित केले होते.
आवश्यक कागदपत्रे
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- चालक परवाना
- जमिनीची कागदपत्रे
Labor Shortage । महिला मजुरांची मोठी टंचाई, कांदा लागवड रखडली
असा करा अर्ज
तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता. तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या बँकेत जा आणि किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करा. यानंतर तुम्हाला वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील. तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल. तसेच तुम्ही बँकांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे केसीसीसाठी अर्ज करू शकता. हे कार्ड मिळवण्यासाठी तुमचं पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खातं असावे.