Farmer success story

Farmer success story । जिद्दीला सलाम! 10 बाय 20 च्या झोपडीत केली मशरुमची शेती, कसं केलं नियोजन

यशोगाथा

Farmer success story । आज अनेक तरुणांनी उच्च शिक्षण घेतले आहे. काही तरुण विदेशात नोकरी करत आहेत. काही तरुण स्वतःचा व्यवसाय (Agri business) करत आहेत. तर काहींना नोकरी मिळणे अवघड बनले आहे. अशात काही तरुण थेट लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती (Agriculture) करू लागले आहेत. त्यातून ते नोकरीपेक्षा जास्त कमाई करत आहेत. शेतीत फक्त नियोजन आणि कष्टाची गरज असते. (Success story)

Kisan Credit Card । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मिळणार 5.50 लाख कोटी रुपये

मशरूम शेती

भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी जास्त शेतजमीन आणि पैसे लागतात असा अनेकांचा समज आहे. पण हे सत्य नाही. तुम्ही कमी जागेत देखील उत्तम कमाई करू शकता. याचाच प्रत्यय सध्या पाहायला मिळत आहे. एका तरुणाने चक्क झोपडीत मशरुमचे उत्पादन घेतले आहे. मशरूम शेती करायची म्हटली की त्यासाठी आधुनिक शेड लागते. पण या शेतकऱ्याने शेडशिवाय उत्पन्न मिळवले आहे.

Agriculture Technology । मशागतीचा खर्च परवडेना, शेतकऱ्याने केले भन्नाट जुगाड; दुचाकीच्या जुगाडातून शोधला पर्याय

रायसिंग वसावे (Rising Vasawe) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात त्यांनी उत्पादन घेतले आहे. योग्य नियोजन आणि कष्ट केल्यास कोणतेच काम अशक्य नसते, हे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. तसेच ते इतर शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण देतात. त्यांनी अवघ्या ३ हजार रुपयात मशरूम शेती (Mushroom farming) केली आहे. लागवडीनंतर २ महिन्यांनी मशरूमचे उत्पादन सुरु झाले.(Mushroom farming information)

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! खडकाळ माळरानाच्या जमिनीवर ऊस पिकवला, 15 गुंठ्यात काढले 45 टन उसाचे उत्पादन!

10 बाय 20 च्या जागेत केली सुरुवात

शेती पिक निघाल्यानंतर राहिलेल्या कचऱ्याला निर्जंतुकीकरण् केल्यावर त्यावर प्रक्रिया करून एका पिशवीत भरून बेड तयार केले जाते. या शेतकऱ्याने घरात 10 बाय 20 च्या जागेत बारमाही मशरूम शेती केली आहे. सध्या बाजारात 300 रुपये किलोने मशरूम विक्री होत आहे. आरोग्यासाठी मशरूम खूप फायद्याचे आहे. त्यामुळे बाजारात मशरूमला खूप मागणी असते.

Ethanol Subsidy । केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल निर्मितीसाठी मिळणार अनुदान

खास करून शहरी भागात याचे प्रमाण जास्त आहे. मशरूम खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे मोठ्या शहरात येथील मशरूमला मोठी मागणी आहे. अनेकजण आपल्याकडे पैसे नसल्याने नशिबाला दोष देत बसतात. पण या तरुणाने मेहनतीने भरघोस उत्पन्न मिळवून दाखवले आहे. कमी खर्चात देखील जास्त उत्पादन मिळवता येते.

Sheep Died । शेतातून घरी जाताना घडला मोठा अनर्थ! अचानक 80 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *