Ethanol Subsidy

Ethanol Subsidy । केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल निर्मितीसाठी मिळणार अनुदान

बातम्या

Ethanol Subsidy । राज्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड (Cultivation of sugarcane) केली जाते. हमखास भरघोस उत्पादन मिळवून देणारे पीक म्हणून उसाकडे (Sugarcane) पाहिले जाते. सध्या राज्यात उसाची तोडणी सुरु आहे. अशातच आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Sugarcane farmers) आणि साखर कारखानदारांसाठी (Sugar mills) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने (Central Govt) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Labor Shortage । महिला मजुरांची मोठी टंचाई, कांदा लागवड रखडली

इथेनॉल निर्मितीसाठी मिळणार अनुदान

‘सी हेवी मोलॅसिस’पासून (C heavy molasses) इथेनॉलची निर्मिती (Production of ethanol) करण्यात येते. यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. सरकारने आता इथेनॉल निर्मितीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. इथेनॉलला (Ethanol) प्रतिलिटर 6 रुपये 87 पैसे अनुदान मिळेल अशी मोठी घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे इथेनॉलला प्रतिलिटर 49 रुपये 41 पैशांऐवजी 56 रुपये 28 पैसे दर मिळेल.

Sheep Died । शेतातून घरी जाताना घडला मोठा अनर्थ! अचानक 80 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान

केंद्र सरकारकडून इथेनॉल दरात 14 टक्के वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना उसाला एफआरपी जास्त मिळेल. दरम्यान, साखर कारखान्यांवर केंद्र सरकारने डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बी हेवी मोलॅसिस आणि सिरपपासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली होती.

Milk Subsidy । दूध अनुदानाची घोषणा हवेतच विरली, अजूनही जीआर नाही

यंदा उसाचे गाळप होणार कमी

कारण यंदा पाऊस मुबलक प्रमाणात न झाल्याने उसाचे गाळप होण्याचे प्रमाण कमी आहे. साहजिकच साखरेचेही उत्पादन कमी असणार आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याने सरकारविरोधी शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला. अशातच आता केंद्र सरकारने इथेनॉलच्या प्रोत्साहन अनुदान दरात वाढ केली आहे.

Solar pump । शेतकऱ्यांनो, या सरकारी योजनेचा लाभ घेऊन मोफत वापरा वीज, जाणून घ्या योजना

सध्या सी हेवी मोलॅसिसचा दर 12 हजार रुपये प्रति टन आहे. असे असले तरी सी हेवी मोलॅसिस निर्यात करण्यात येते. आता सरकारच्या या निर्णयामुळे देशातंर्गत इथेनॉल निर्मितीला चालना मिळेल. अशातच मोलॅसिस निर्यातीवर 50 टक्के निर्यात कर लागू करण्याबाबत सरकारी पातळीवरून हालचाली सुरु असल्याची माहिती आहे.

Crop Damages Limit । अवकाळीने झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईबाबत शासनाचा मोठा निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *