Tomato Rate

Tomato Rate । टोमॅटोचे दर कोसळले, शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ

बाजारभाव बातम्या

Tomato Rate । मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोच्या दराने चांगलीच उच्चांकी गाठली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र फक्त दोन महिनेच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले त्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी आता पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. टोमॅटोचे दर पुन्हा कमी झाले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चांगले अडचणीत सापडले आहेत. टोमॅटोला भाव मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी पैसे खर्च करून टोमॅटोची लागवड केली मात्र आता लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Tomato Rate)

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींचा तर कायमच सामना करावा लागतो यामध्ये अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल यामधून शेतकरी सतत स्वतःला सावरत आपले काम करत असतो. मात्र जर शेतमालास योग्य भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहते. दरम्यान महिनाभरापूर्वी ज्या टोमॅटोने भाव खाल्ले तोच टोमॅटो आता शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि नारायणगाव मध्ये तर टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

शेतकऱ्यांनी दिले टोमॅटो फेकून

मागच्या महिन्यात बाजारामध्ये टोमॅटोची आवक कमी होती आणि आवक कमी असल्यामुळे टोमॅटोला दर देखील जास्त मिळत होता. टोमॅटोला 3000 ते 2500 रुपये प्रतिक्रेट असा दर मिळत होता, यानंतर केंद्र सरकार टोमॅटोच्या दराबाबत गंभीर होत यावर नियंत्रण करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे अवघ्या महिन्याभरातच टोमॅटोसह इतर भाजीपाल्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर रस्त्यावर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.

टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे. शेतकऱ्यांनी नारायणगाव बाजार समितीमध्ये सरकारचा जाहीर निषेध केला आहे. टोमॅटोचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांनी हातात टोमॅटो घेऊन केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *