Devendra fadnavis । महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक कापूस (Cotton) आहे. विशेषतः कापसाची खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कापूस लागवड (Cotton cultivation) केली जाते. मागील काही वर्षांपासून कापसाला चांगला दर (Cotton rate) मिळत असल्याने याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून कापसाला MSP पेक्षा कमी दर दिला जात आहे, अशी तक्रार शेतकरी तक्रार करत होते. यावर आता राज्य सरकारने (State Govt) कडक पाऊले उचललं आहे. अशातच आता कमी किमतीत कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत.
Biological Pesticides । आता शेतीचा खर्च होईल खूपच कमी, घरच्या घरीच तयार करा ‘हे’ जैविक कीटकनाशक
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच आता कमी पैशात कापूस खरेदी करणाऱ्यांवर सरकारची करडी नजर असणार आहे. कमी किमतीत कापूस खरेदी करणाऱ्या लोकांवर आता गुन्हे दाखल करून कापूस खरेदीवर चाप बसवला जाईल. MSP पेक्षा कमी दरात कापूस खरेदी केली तर संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये दिले आहेत.
शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा
सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जर यापुढे कुणी कमी दरात कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करणार असेल तर त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करा, असा आदेशच फडणवीस यांनी दिला आहे. दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून कापूस, सोयाबीन आणि कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Cotton Procurement । मोठी बातमी! ‘पणन’कडून यंदा पांढऱ्या सोन्याची खरेदी नाहीच
कापसाचे दर वाढतील या आशेने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षीचा कापूस साठवून ठेवला आहे. पण अजूनही दर वाढले नाहीत. कापसाला ७ हजार २० रूपये हमीभाव जाहीर केला असला तरी एकाही बाजार समितीमध्ये तेवढा दर मिळाला नाही. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज एच-४-मध्यम स्टेपल, हायब्रीड, लोकल, मध्यम स्टेपल या कापसाची आवक झाली होती.
Farmer Relief Fund । बिग ब्रेकिंग! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३३२ कोटी रुपये मंजूर