Farmer Relief Fund

Farmer Relief Fund । बिग ब्रेकिंग! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३३२ कोटी रुपये मंजूर

शासकीय योजना

Farmer Relief Fund । दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांना अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या संकटांमुळे दरवर्षी अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. यंदा अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवर असणारी शेतीचे नुकसान केले आहे.

Maharashtra Rain । शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळीचे संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस

शेतकऱ्यांना मिळणार ३३२ कोटी रुपये

अकोला जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा आहे. (Fund for Farmer) दोन लाख ४६ हजार १८८ शेतकऱ्यांसाठी ३३२ कोटी ९६ लाख रुपये मंजूर केले आहेत. शेतकऱ्यांना वाढीव दरांसह मदत मंजूर झाली आहे. दरम्यान, या जिल्ह्यात कपाशी आणि तुरीला जोरदार फटका बसला होता. (Disbursement of Fund)

Farmer Scheme । वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार वयोश्री योजना, या पद्धतीने घ्या लाभ

महसूल विभागाकडून मंजुरी

यामुळे नुकसान भरपाईसाठी २०७ कोटी ९२ लाख ६४ हजार ८१० रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यानंतर हेक्टरची मर्यादा वाढवल्याने त्यानुसार नवा प्रस्ताव आयुक्तांना सादर केला आहे. अशातच आता या दोन्ही प्रस्तावांना एकत्रितपणे महसूल विभागाकडून मंजुरी दिली आहे. एसडीआरफच्या निकषानुसार याआधी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येत होती.

Farmer Scheme । शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना! मिळत आहे लाखोंचं अनुदान, असा करा अर्ज

पण सरकारने हे प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाढवले आहे. सरकारच्या निर्णयानुसार कोरडवाहू शेतीसाठी आठ हजार ५०० रुपये ऐवजी १३ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपयांऐवजी २७ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी २२ हजार ५०० रुपयांऐवजी ३६ हजार रुपयांची मदत दिली जाणारा आहे.

Government Scheme । मोठी बातमी! वारसदारांना मिळणार शेतकरी अपघात विमा योजनेचे पैसे

मागील वर्षांपासून सरकारतर्फे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर (डीबीटीद्वारे) आर्थिक मदत देण्यात येते. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे आहे. तहसील स्तरावरून कार्यवाही केली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येईल.

Mosambi Rate । तरुणाचा नादच खुळा! हायवेच्या कडेला चालू केले मोसंबी ज्यूस सेंटर; महिन्याला मिळणारी कमाई ऐकून व्हाल थक्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *