Maharashtra Rain

Maharashtra Rain । शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळीचे संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस

हवामान

Maharashtra Rain । राज्यातील शेतकरी यंदा चांगलाच हवालदिल झाला आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने राज्यातील (Rain in Maharashtra) काही भागांमध्ये पाठ फिरवली. पाऊस वेळेत न पडल्याने पिके जळून गेली. अशातच काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Farmer Scheme । वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार वयोश्री योजना, या पद्धतीने घ्या लाभ

विदर्भात पावसाची शक्यता

अशातच आता शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळीचे संकट आले आहे. कारण हवामान खात्याने पावसाचा अंदाज (IMD Alert) वर्तवला आहे. राज्यातील काही भागांमध्ये येत्या ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासहीत तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (IMD Update)

Farmer Scheme । शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना! मिळत आहे लाखोंचं अनुदान, असा करा अर्ज

यामध्ये वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, वाशिम ५ जिल्ह्यांमध्ये १० आणि ११ फेब्रुवारीला शक्यता जास्त आहे, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी सांगितले आहे. तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता असून नांदेड हिंगोली परभणी या ३ जिल्ह्यांमध्ये किरकोळ पावसाची शक्यता आहे.

Government Scheme । मोठी बातमी! वारसदारांना मिळणार शेतकरी अपघात विमा योजनेचे पैसे

येथे असणार थंडी कायम

इतकेच नाही तर मुंबईसह कोकण आणि खानदेश सोडून मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये आकाश केवळ निरभ्रच राहून थंडी कायम राहणार आहे. तसेच उत्तर भारतामध्ये समुद्रसपाटीपासून दहा ते बारा किलोमीटर उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २७० ते ३०० किमी वेगाने प्रवाही झोताचे पश्चिमी वारे वाहत आहे.

Mosambi Rate । तरुणाचा नादच खुळा! हायवेच्या कडेला चालू केले मोसंबी ज्यूस सेंटर; महिन्याला मिळणारी कमाई ऐकून व्हाल थक्क

असे असल्याने महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्रोत अजूनही कायम आहे, असा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. मध्य भारतात थंडीबरोबर, विदर्भालगतच्या छत्तीसगड आणि ओडिशा दरम्यान हवेचे उच्च दाब क्षेत्रही तयार झाले असल्याने घड्याळ काटा फिरतो त्या दिशेप्रमाणे हवेच्या उच्चदाब क्षेत्राच्या मध्यबिंदूपासून बाहेर फेकल्याप्रमाणे प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचे क्लॉकवाईज पद्धतीने गोलाकार वहन होत आहे.

Soybean Rate । सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; वाचा किती मिळतोय दर?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *