Government Scheme । राज्यात मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाते. पण शेती करताना अनेक अपघात होतात. यामध्ये पूर, सर्पदंश, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे यांचा समावेश आहे. अनेकदा या अपघातांमुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव जातो. जर घरातील कर्ता पुरुषच गेला तर त्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. हीच समस्या लक्षात घेता सरकारने एक योजना (Agriculture Scheme) आणली आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
या योजनेचे नाव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme) असे आहे. या योजनेविषयी आज कृषी विभागाने महत्त्वाचा आदेश काढला आहे. सरकारने आता या योजनेच्या एप्रिल २२ ते ऑगस्ट २२ या कालावधीतील प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामुळे २४५३ शेतकरी आणि त्यांचे वारसदार यांच्या खात्यावर विम्याच्या दाव्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Farmer Accident Insurance Scheme)
Soybean Rate । सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; वाचा किती मिळतोय दर?
दरम्यान, २४५३ पैकी ४९ शेतकऱ्यांना अपघातानंतर अपंगत्व आले आहे. तर उरलेल्या शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ही योजना ७ एप्रिल २०२२ पासून लागू करणे गरजेची होते. पण प्रशासकीय कारणास्तव ही योजना ७ एप्रिल २०२२ पासून लागू होऊ शकली नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत दि.७ एप्रिल २०२२ ते दि.२२ ऑगस्ट २०२२ या खंडीत कालावधीमध्ये प्राप्त झालेले प्रस्ताव निकाली काढण्यासाठी कृषी विभागाने मान्यता दिली आहे.
इतकेच नाही तर २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या खंडीत कालावधीसाठीही पात्र दावे मंजूर केले आहेत. त्यानुसार या २३९ दिवसाच्या खंडीत कालावधीतील पहिल्या आणि दुसऱ्या टप्यातील पात्र प्रस्तावांच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी / वारसदारांना आर्थिक मदतीची रक्कम शासनामार्फत अदा करण्यासाठी एकूण रु ४७.१२. कोटी रक्कम वितरीत करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती.
यांनाही मिळणार पैसे
तसेच पहिल्या टप्यातील २३९ (२३७ मृत्यु + २ अपंगत्व) पात्र दावे निकाली काढण्यासाठी रक्कम रु.४.७६ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील २१३७ (२०९४ मृत्यु + ४३ अपंगत्व) पात्र दावे निकाली काढण्यासाठी रक्कम रु.४२.३६ कोटी अशी एकूण रु.४७.१२ कोटी रक्कम वितरीत करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दिनांक ०७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या १३८ दिवसाच्या खंडीत कालावधीतील ७७ (७३ मृत्यु + ४ अपंगत्व) पात्र दावे निकाली काढण्यासाठी रु.१.५१ कोटी रक्कम वितरीत करण्यासाठीही मान्यता दिली आहे.
Cabinet Dicision । मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला धडाकेबाज निर्णय; होणार मोठा फायदा