Mosambi Rate । सध्या थंडी कमी झाली असून दिवसा उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी थंड पदार्थांची विक्री देखील सुरू झाली आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक जण थंड ज्यूस पिण्यास जास्त प्राधान्य देतात. यामुळे अनेक जण ज्यूस सेंटर किंवा अन्य थंड पदार्थांचे व्यवसाय सुरू करतात. सध्या देखील मराठवाड्यातील रस्त्यावर मोसंबीची दुकान थाटली जात आहेत.
Soybean Rate । सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; वाचा किती मिळतोय दर?
अनेक तरुण नोकरीला प्राधान्य न देता स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहेत. सध्या देखील अशाच एका तरुणाने हायवेच्या कडेला ज्यूस सेंटर उभारले आणि या ज्यूस सेंटर मधून तो दिवसाकाठी चांगली कमाई देखील करत आहे. छत्रपती संभाजीनगरहून लातूर, धाराशिवकडे जाताना मोसंबी ज्यूसची दुकान वाढली आहेत. अडुळ गावातील रघुनाथ भावले या तरुणाने देखील ज्यूस सेंटर सुरू केले असून त्याची चांगली कमाई होत आहे.
रघुनाथ भावले या तरुणाची धुळे सोलापूर रस्त्याने जाताना रस्त्याकाठीच मोसंबीची बाग आहे. सहा एकरात या तरुणाने मोसंबीची बाग लावलेली आहे. मात्र सध्या मोसंबीला म्हणावा असा बाजारभाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी मोसंबीचे ज्यूस विकण्याचा निर्णय घेतला आहे.
Cabinet Dicision । मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला धडाकेबाज निर्णय; होणार मोठा फायदा
रस्त्यासाठी बाग असल्याने येणारे जाणारे थांबतील असा विचार करून या तरुणाने मोसंबीचा ताजा रस विकण्यासाठी ज्यूस सेंटर सुरू केले आहे. सध्या या तरुणाची सगळीकडे चर्चा होत आहे. या तरुणाच्या कमाई बद्दल पाहिले तर हा तरुण महिन्याकाठी जवळपास ज्यूस सेंटर मधून १ लाख रुपये कमवत आहे.
त्या ठिकाणी मोसंबी फळ आणि मोसंबी ज्यूस दोन्ही विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर मोसंबी ज्यूस घ्यायचे असेल तर ३० रुपये ग्लास या दराने मोसंबीचे ज्यूस विकले जाते आणि मोसंबी घ्यायची असेल तर ४० रुपये किलोने मोसंबी विकली जात आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यामुळे ज्यूसची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.