Inspirational Story | शेतातील पीक निघाले की उरलेल्या तणाचे काय करायचे? हा प्रश्न नेहमीच शेतकरी मित्रांसमोर असतो. अनेक शेतकरी हे तण शेतातच जाळून टाकतात मात्र, त्यामुळे प्रदूषण वाढते. पंजाबमधील एका शेतकरी पठ्ठ्याने यावर चांगलाच जालीम उपाय शोधून काढला आहे. एवढंच नाही तर त्याने या उर्वरित तणातून तब्बल 16 लाख रुपयांची कमाई केली आहे.
पंजाबमधील मालेरकोटला मधील कुथाला गावचे शेतकरी गुरप्रीत सिंह कुथाला यांनी आपल्या शेतातील तणाची योग्य ती विल्हेवाट लावत लाखो रुपयांची कमाई केली आहे. मागील वर्षी गुरप्रीत सिंह यांनी भाताचे पीक घेतले होते. हे पीक काढल्यानंतर शेतात उरलेला कचरा त्यांनी जाळून टाकला नाही. त्यांनी यावर पर्यावरणपूरक उत्तर शोधून काढले.
गुरप्रीत सिंह यांनी पंजाब सरकारच्या ५० टक्के अनुदानातून शेतातील कचरा बारीक करणारे यंत्र विकत घेतले. यानंतर पंजाब संगरुर जिल्ह्यातील RNG बायोगॅस प्लांटशी एक करार केला. गुरप्रीत सिंह यांनी या बायोगॅस प्लांटला 12,000 क्वींटल पिकाचा उरलेला कचरा विकून 16 लाखाची कमाई केली आहे.
Someshwar Factory । मोठी बातमी! बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा दसऱ्याच्या मुहूर्तावर गळीत प्रारंभ
अगामी काळात अशाच पद्धतीने शेतातील 28 हजार क्विंटल टाकाऊ पदार्थ विकून सुमारे 1 कोटी रुपये कमविण्याचे लक्ष गुरप्रीत सिंह यांनी ठेवले आहे. एवढंच नाही तर भाताचा कचरा विकण्यासाठी त्यांनी चार कचरा बारीक करणारी चार नवीन यंत्रे देखील विकत घेतली आहेत. विशेष बाब म्हणजे पंजाब मधील आम आदमी पार्टीने या शेतकऱ्यांसंबंधी ट्विट करत कौतुक केले आहे. यामध्ये ‘Earn – Don’t Burn’ म्हणजेच ‘कमवा – जाळू नका’ असा संदेश देण्यात आला आहे.
Havaman Andaj । मोठी बातमी! देशातील ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता