Someshwar Cooperative Sugar Mills

Someshwar Factory । मोठी बातमी! बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा दसऱ्याच्या मुहूर्तावर गळीत प्रारंभ

बातम्या

Someshwar Factory । सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 24 तारखेला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते हा शुभारंभ संपन्न होणार आहे. राष्ट्रवादी सोबत बंडखोरी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रथमच बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात येणार आहेत. त्यामुळे यावेळी ते काय बोलतील? कारखान्याच्या विविध प्रश्नांवर काय भूमिका मांडतील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Someshwar Cooperative Sugar Mills)

Havaman Andaj । सावधान! पुढील २४ तासात या भागात वादळी वाऱ्यासह कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

सोमेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते याचे शुभारंभ होणार आहे. या प्रसंगी अनेक शेतकरी कार्यकर्ते त्याचबरोबर काही नेते देखील उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पुरंदरचे आमदार संजय जगताप, खंडाळाचे आमदार मकरंद पाटील आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Mango Variety । आंब्याच्या ‘या’ मुख्य जातींपासून शेतकरी प्रत्येक हंगामात मिळवतील भासघोस उत्पन्न; जाणून घ्या सविस्तर माहिती

मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याचबरोबर नुकतीच त्यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी देखील निवड करण्यात आली आहे. यामुळे आता कारखान्याने त्यांचा सत्कार समारंभ देखील आयोजित केला आहे. करंजेपुलाच्या मुख्य चौकापासून ते कारखान्यापर्यंत अजित पवार यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Onion Rate । मोठी बातमी! दिवाळीपूर्वी कांदा महागला, 50 रुपये किलोने ‘या’ ठिकाणी विकला जातोय कांदा

राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट झाल्यानंतर अजित पवार तालुक्याच्या पश्चिम भागात पहिल्यांदाच येणार आहे. त्यामुळे यावेळी ते कार्यकर्त्यांशी त्याचबरोबर मतदारांशी काय संवाद साधतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Fertilizers Information । शेतकऱ्यांनो, तुम्ही पिकाला देता ते खत खरे की खोटे? घरी बसल्या ‘या’ सोप्या पद्धतीने ओळखा; वाचा सविस्तर माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *