Government Schemes | महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती हा प्राथमिक व्यवसाय केला जातो. दरम्यान शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे तसेच त्यांना भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना आणि उपक्रम राबविले जातात. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू करावेत यासाठी देखील शासन प्रोत्साहन देते.
Someshwar Factory । मोठी बातमी! बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा दसऱ्याच्या मुहूर्तावर गळीत प्रारंभ
मात्र, आता सरकारने शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांसाठी देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात असे भरपूर शेतमजूर आहेत ज्यांच्याकडे स्वतःची शेती नसल्यामुळे इतरांच्या शेतात जाऊन मजुरी करावी लागते. या लोकांना स्वतःची शेतजमीन घेण्याची इच्छा असते. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतमजुरांना शेतजमीन खरेदी करणे शक्य नाही. यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण’ योजना सुरू केली आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना
या योजनेअंतर्गत मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तींना आणि भूमिहीन शेतमजूरांना जमीन उपलब्ध करून दिली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानाचा लाभ दिला जातो. 2004 मध्ये राज्यसरकारने ही योजना सुरू केली होती. यानंतर 2018 मध्ये या योजनेत महत्त्वाचे बदल करून अनुदान वाढविण्यात आले.
Onion Rate । मोठी बातमी! दिवाळीपूर्वी कांदा महागला, 50 रुपये किलोने ‘या’ ठिकाणी विकला जातोय कांदा
कोणाला लाभ मिळणार ?
१) अनुसूचित जाती
२) नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतकरी
Subsidy | असा मिळतो लाभ
या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना चार एकर जिरायती शेतजमीन खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त 20 लाखांचे अनुदान दिले जाते. तसेच दोन एकर बागायती जमिनीसाठी जास्तीत जास्त 16 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.
Havaman Andaj । पावसाबाबत मोठी बातमी! कोकणासह ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या माहिती
Documents | आवश्यक कागदपत्रे
1) पासपोर्ट साईझ फोटो
2) रहिवाशी दाखला
3) रेशनकार्ड झेरॉक्स
4) आधार कार्ड झेरॉक्स
5) मतदान ओळखपत्र
6) भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला