Success Story । दुष्काळी परिस्थितीवर मात करत फुलवली खरबुज शेती, आज होतेय लाखात कमाई

यशोगाथा

Success Story । अनेकजण शेतीत आता नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. ज्याचा त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. हल्ली शेतकरी आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. पूर्वी पारंपरिक पिकातून फारशी कमाई होत नव्हती, पण आधुनिक पिकांना बाजारात चांगली मागणी आहे. जर शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर कष्ट आणि योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. (Farmer Success Story)

Tur Market Price । कधी वाढणार तुरीचे भाव, जाणून घ्या अभ्यासकांचे मत

कितीही संकट आले तरी शेतकरी मागे हटत नाहीत. अशाच एका शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीवर मात करत खरबुज शेती (Melon farming) फुलवली आहे. ज्यातून तो लाखो रुपयांची कमाई करत आहे. हा शेतकरी लोहारा तालुक्यातील हिप्परगा गावातील रहिवासी आहे. संतोष गवळी (Santosh Gawli) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांनी खरबुज लागवडीसाठी (Melon cultivation) आधुनिक पद्धतीचा वापर केला.

Maize Rate । मकाच्या दरात सर्वाधिक वाढ! जाणून घ्या बाजारात किती मिळतोय दर?

असे केले नियोजन

संतोष गवळी यांनी एक एकर शेतामध्ये ही खरबूज लागवड केली आहे. सध्या खरबूज तोडणीला आले आहेत. त्यांनी सर्वात अगोदर एक एकरची चांगली मशागत केली त्यांनतर बेड पाडत, त्यावर मल्चिंग, ठिबक व्यवस्था केली. त्यामुळे त्यांना कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यास मदत झाली. खरबूज लागवडीसाठी त्यांनी ‘बॉबी’ या जातीची निवड केली. एक एकरमध्ये त्यांनी 6 हजार रोपांची लागवड केली.

Industrial Electricity । मोठी बातमी! आता औद्योगिक वीज जोडणीच्या खर्चाचा भार उचलणार महावितरण

उत्पन्न किती?

सध्या या पिकाची काढणी सुरु आहे. खर्चाचा विचार केला तर आतापर्यंत खरबूज लागवडीसाठी एक एकरसाठी एकूण एक लाख रुपयांचा खर्च आला आहे. यात मल्चिंग, ठिबक, खते, औषध फवारणी आणि इतर खर्चाचा समावेश आहे, असे ते सांगतात. सध्या खरबुजाला बाजारात 40 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. त्यामुळे त्यांना जास्त नफा होण्याची आशा आहे.

Grape rates । धक्कदायक! करपा रोगाचा प्रादुर्भावामुळे द्राक्ष उत्पादकांचे तब्बल ३०० कोटींचे नुकसान

इतकेच नाही तर त्यांनी गेल्या वर्षी आपल्या एक एकरमध्ये मिरचीची लागवड केली होती. त्यातून त्यांना एकरात केवळ चार महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल 4 लाखांचा निव्वळ नफा झाला होता. आता यंदा त्यांनी खरबूज लागवडीचा प्रयोग केला आहे. यंदाही त्यांना त्यातून जास्त नफा होण्याची अपेक्षा आहे.

Tractor Subsidy Scheme । ट्रॅक्टरसाठी मिळतंय 50 टक्के अनुदान? जाणून घ्या यामागचं सत्य, नाहीतर होईल फसवणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *