Tractor Subsidy Scheme । शेतकरीवर्गाला अनेक समस्यांचा सामना करत शेती करावी लागते. यात त्यांना दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. तर कधीकधी शेतमालाला हमीभाव नसतो. या समस्यांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन सरकार विविध योजना (Subsidy Scheme) राबवत असते.
Advance Crop Insurance । ब्रेकिंग न्यूज! ‘या’ जिल्ह्यात २१४ कोटी ६२ लाख रुपयांचा अग्रिम विमा वाटप
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना
ज्याचा देशातील करोडो शेतकऱ्यांना लाभ होतो. पण काही अशा योजना आहेत ज्या सरकारने सुरु केल्या नाही. पण अनेक शेतकरी बनावट योजनांना बळी पडतात. यापैकी सरकारची एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना (Tractor Subsidy Scheme For Farmers) होय. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान (Tractor Subsidy)दिले जात असल्याचा दावा केला जातो.सध्या या योजनेची सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चा होत आहे.
Intercropping in Sugarcane । ऊसामध्ये आंतरपीक घेणे फायद्याचे की तोट्याचे? वाचा महत्वाची माहिती
….तर होईल आर्थिक फसवणूक
सोशल मीडिया पोस्ट किंवा इतर काही माध्यमातून केंद्र सरकारकडून ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के सबसिडी देण्यात येत आहे, असे सांगण्यात येत आहे. अनेकजण याला बळी पडून योजनेसाठी अर्ज देखील करत आहेत. पण वास्तवात हे सत्य नाही. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर याबाबत सत्यता पडताळून पहा. नाहीतर तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते.
Goat rearing । दूध दर झाले कमी, पशुपालकांचा वाढला शेळीपालनाकडे कल
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना ही सरकारची योजना नाही. इंटरनेटवर फक्त या योजनेची वेबसाईट आहे. अशी वेबसाईट आणि योजना केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडून राबवली किंवा चालवली जात नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही वेबसाईट आणि योजना पूर्णपणे बनावट असल्याने शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.
Tree Plantation Scheme । धक्कादायक! अनुदान अपहारप्रकरणी न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश
दरम्यान, असे अनेक शेतकरी आहेत, जे बनावट योजनांना बळी पडतात आणि त्यांची आर्थिक फसवणूक होते. त्यामुळे बनावट वेबसाइट्सपासून दूर राहा आणि चुकूनही पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी (PM Kisan Tractor Scheme) जारी केलेल्या बनावट वेबसाइटवर अर्ज करू नका. नाहीतर तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
Guar rate । मोठी बातमी! गवारीच्या दरात सर्वाधिक वाढ; पाहा किती मिळतोय दर?