Rabi Crop Seed Subsidy । खरीप हंगामात शेतकऱ्यांना पावसामुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. या हंगामात त्यांना अपेक्षित कमाई करता आली नाही. शेतकरी आता रब्बी हंगामाची पेरणी (Rabi Crop) करत आहेत. या हंगामात शेतकरी हरभरा आणि गव्हाची मोठ्या प्रमाणावर लागवड करत आहेत. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
LPG Cylinder । सर्वसामान्यांना दिलासा! सिलिंडरचे पुन्हा घसरले दर, जाणून घ्या नवीनतम किमती
सरकारकडून आता रब्बी करिता हरभरा बियाण्यावर अनुदान (Seeds Subsidy) दिले जात आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून रब्बी हंगामाकरिता कडधान्य योजनेअंतर्गत दहा वर्षाच्या आत आणि दहा वर्षावरील हरभरा बियाणे महाबीजकडून आता अनुदानावर (Rabi Crop Subsidy) उपलब्ध करून दिले जात आहे. दहा वर्षाच्या आतील हरभऱ्याचे बियाणे 3294 रुपये क्विंटल आणि दहा वर्षांवरील 1108 क्विंटल बियाणे मिळेल.
किती मिळेल अनुदान?
किमतीचा विचार केला तर दहा वर्षाच्या आतमध्ये फुले विक्रांत, फुले विक्रम, एकीजी 1109, बीजीएम 10216 या हरभऱ्याच्या वाणाच्या बियाण्यांची 20 किलोच्या बॅगेची किंमत 1700 रुपये प्रति बॅग इतकी आहे. यावर पाचशे रुपयांचे अनुदान मिळेल. त्यामुळे ही बॅग शेतकऱ्यांना 1200 रुपयांना खरेदी करता येईल. दहा वर्षांवरील विजय दिग्विजय या वाणाची बॅग 20 किलोची आहे. तिची किंमत 1540 रुपये आहे. यावर 300 रुपयांच्या अनुदान मिळेल.
Cyclone । राज्याला चक्रीवादळाचा धोका! ‘या’ राज्यांमध्ये पडणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
आवश्यक कागदपत्रे
अनुदानित हरभरा बियाणे शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार मिळेल. शेतकऱ्यांना पाच एकर करिता पाच बॅगेपर्यंत खरेदी करता येईल. शेतकऱ्यांना यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यांना कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून परमिट घ्यावी लागेल. ते परमिट घेऊन आणि इतर शेतकऱ्यांनी सातबारा तसेच आधार कार्डची झेरॉक्स प्रत देऊन बियाणे खरेदी करावे लागेल.
महत्त्वाचे म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी अर्ज करतील त्यावेळी ज्या शेतकऱ्यांची निवड होईल त्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून परमिट दिले जाईल. त्यानंतरच कृषी निविष्ठा विक्रेता दुकानातून बियाणे मिळेल. शेतकऱ्यांसाठी महाबीजकडून 10 वर्षांच्या आतील आणि 10 वर्षांवरील हरभरा बियाणे अनुदानावर उपलब्ध करून दिले आहे.
Garlic Cultivation । लसूण लावताय? तर मग करा ‘या’ वाणाची लागवड, मिळेल भरघोस उत्पादन