Pm Kisan Tractor Yojana

Pm Kisan Tractor Yojana । शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार 15 लाख, जाणून घ्या योजना

शासकीय योजना

Pm Kisan Tractor Yojana । महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागतोय. या कारणामुळे शेती करणं अलीकडे खूप कठीण काम बनले आहे. शेतकऱ्यांनी शेतीत अगदी मशागतीपासून ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरणावर जोर देण्यात येत आहे. यात ट्रॅक्टरचा वापर जास्त प्रमाणात केला जात आहे.

Cyclone । राज्याला चक्रीवादळाचा धोका! ‘या’ राज्यांमध्ये पडणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

कृषिप्रधान अशी आपल्या देशाची ओळख आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असते. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी यांत्रिकीकरणाला चालना दिली जात आहे. ट्रॅक्टर सारख्या यंत्रांच्या खरेदीवर सरकारकडून अनुदान (Tractor Subsidy) देण्यात येत आहे. ज्याचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. ट्रॅक्टर खरेदी करणे सोपी गोष्ट नाही.

Sugarcane Transport Vehicles । ऊस वाहतूकदारांना आता रेडिअम, रिफ्लेक्टर बंधनकारक; अन्यथा होणार कडक कारवाई

तुम्ही आता पीएम किसान ट्रॅक्टर योजनेच्या (Tractor Yojana) माध्यमातून अर्ज (Pm Kisan Tractor Yojana Application) करू शकता. या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टरच्या किमतीवर 20 टक्के अनुदान मिळते. मागील काही महिन्यांपासून या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी देण्यात येणारे कर्ज वितरण बंद केले होते. परंतु, आता ते पुन्हा चालू केली आहे. अण्णासाहेब पाटील मंडळातर्फे राबवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये कर्ज घेणाऱ्याला कर्जाच्या व्याजावर 70% ते 80 % व्याज परतावा मिळेल.

Garlic Cultivation । लसूण लावताय? तर मग करा ‘या’ वाणाची लागवड, मिळेल भरघोस उत्पादन

जाणून घ्या पात्रता

 • शेती योग्य जमिनी असणाऱ्यांना या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळेल.
 • ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणताच ट्रॅक्टर खरेदी केला नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते.
 • या योजनेचा लाभ हा केवळ एकदाच मिळतो.
 • एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येतो.

Silk Market Rate । शेतकऱ्यांची चांदी! रेशीम कोशाला अच्छे दिन, क्विंटलला मिळाला ५० ते ५५ हजारांचा दर

येथे करा अर्ज

या योजनेसाठी सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज (Tractor Yojana Application) करू शकता. परंतु 2023 मध्ये याच्या अंमलबजावणी बाबत सरकारकडून माहिती दिली नाही. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सीएससी केंद्रावर अर्ज शेतकऱ्यांना सादर करता येईल, असे सांगण्यात येत आहे.

Havaman Andaj । आज कुठे कोसळणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • रेशन कार्ड
 • शाळा सोडल्याचा दाखला / जातीचे प्रमाण पत्र
 • ३ वर्षे उत्पनाचा तहसीलचा दाखला
 • कॅन्सल चेक
 • आधारला लिंक असलेले मोबाइल नंबर

Apple Cultivation । कशी बहरली हिमाचलची ओळख असणाऱ्या सफरचंदाची शेती? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *