Garlic Cultivation

Garlic Cultivation । लसूण लावताय? तर मग करा ‘या’ वाणाची लागवड, मिळेल भरघोस उत्पादन

कृषी सल्ला

Garlic Cultivation । लसणामुळे भाजीला चव येते. लसूण केवळ स्वयंपाकामध्ये नाही तर तो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. शेतकरी प्रत्येक वर्षी लसणाची लागवड करतात. खास करून थंडीच्या दिवसात याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कारण हे वातावरण लसणासाठी खूप फायदेशीर असते. जर तुम्हाला चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्हाला चांगल्या वाणाची लागवड (Cultivation of Garlic) करावी लागते.

Silk Market Rate । शेतकऱ्यांची चांदी! रेशीम कोशाला अच्छे दिन, क्विंटलला मिळाला ५० ते ५५ हजारांचा दर

हे आहेत लसणाचे सुधारित वाण

  • भीमा पर्पल

लसणाची ही जात कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाद्वारे विकसित केली आहे. ही जात (Garlic Cultivation Information) अधिकतम उत्पादन आणि चांगली प्रत यासाठी खूप लोकप्रिय आहे. मध्यम आकाराचा एकसंध जांभळट रंग असणारा, १६ ते २० कळ्या/पाकळ्या असणारा कंद असतो. एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ३३.६ टके आणि अॅलिसिन प्रमाणे २.५ मि.ग्रॅ. प्रती ग्रॅम असते. त्याशिवाय सुकवलेल्या वजनाच्या प्रमाणे ९६ मि.ग्रॅ. प्रती ग्रॅम प्रमाणे असते. उत्पादन ६ ते ७ टन प्रती हेक्टर असते.

Havaman Andaj । आज कुठे कोसळणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

  • गोदावरी

ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विकसित केली असून त्याचा रंग जांभळा-पांढरा आणि गड्डा मध्यम आकाराचा असून चव-तिखट असते. या प्रत्येक गड्ड्यात २४ पाकळ्या असतात. या जातीचा कालावधी १४० ते १४५ दिवसांचा असतो. या जातीचे सरासरी उत्पन्न १०० ते १५० क्विटल इतके असते. या जातीत रोग आणि किडींचे प्रमाण कमी असते.

Apple Cultivation । कशी बहरली हिमाचलची ओळख असणाऱ्या सफरचंदाची शेती? जाणून घ्या

  • फुले निलिमा

ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विकसित केली असून या वाणाचा गड्डा आकाराने मोठा, आकर्षक, जांभळ्या रंगाचा असतो. ही जात फुलकिडे, जांभळा करपा, कोळी या रोग आणि किडीस मध्यम प्रतिकारक्षम असते.

Poultry Farm । भावाच्या जिद्दीला सलाम! पोल्ट्री व्यवसाय सुरु केला अन् कमवतोय लाखो रुपये

  • श्वेता

ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे तयार केली आहे. या जातीचा गड्डा मोठा जातो. ज्याची जाडी ५.२ सेंमी आणि उंची ५ सेंमी आहे. रंग पांढरा शुभ्र, चव तिखट आणि एका लसणाच्या गाठीत २६ पाकळ्या असतात. या जातीचा कालावधी १३० ते १३५ दिवसांचा असून या जातीपासून हेक्टरी १०० ते १३० किंटल उत्पन्न मिळते.

Success Story । शेतकऱ्याची कमालच न्यारी! उजनीच्या तीरावर केली स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड, सव्वा एकरात मिळाले तब्बल २० लाखांचे उत्पन्न

  • भीमा ओमकार

ही जात कांदा व लसूण संशोधन संचालनालयाद्वारे विकसित केली आहे. प्रत्येक कांद्यामध्ये १८ ते २० पाकळ्या असून यातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ४१.२ टक्के असते. वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रायोगिक तत्वावर केलेल्या उत्पादनाच्या पाहणीनुसार उत्पादनाचे प्रमाण ८० ते १४० किंटल प्रती हेक्टर असते. सरासरी उत्पादन १०७.६ किंटल प्रती हेक्टर असते.

Asafoetida History | जेवणाची चव वाढवणारा हिंग भारतात कोठून आला? जाणून घ्या हिंगाचे आरोग्यदायी फायदे

  • अंग्री फाउंड व्हाईट

ही जात एन.एच.आर.डी.एफ नाशिक येथे विकसित केली आहे. ही जात पांढरे गड्ढे असणारी, चव मध्यम तिखट तसेच गड्डा आकाराने मोठा असतो. या वाणाची जाडी ४ ते ४.५सेंमी व उंची ४.५ सेंमी असते. या लसणाच्या पाकळयांची संख्या १३ ते १८ च्या दरम्यान असते. लागवडीपासून ही जात १२०- १३५ दिवसात काढता येते. हेक्टरी सरासरी उत्पादन १३० ते १४० क्विंटल मिळते.

Success Story । नोकरीला लाथ मारली अन् सुरु केला चहाचा कुल्हार बनविण्याचा व्यवसाय, गावातील अनेकांना दिला रोजगार; ३१ वर्षीय तरुण कमावतोय लाखो रुपये

  • जी-२८२

ही जात एन.एच.आर.डी.एफ नाशिक येथे विकसित केली आहे. गाठी पांढऱ्या रंगाचे असतात. १५ ते १६ पाकळया असतात. या जातीपासून १७५ ते २०० विंटल प्रति हेक्टर उत्पन्न प्राप्त होते.

Success Story । छोट्या जागेत मोत्यांची शेती करून शेतकरी कमावतोय लाखो रुपये; जाणून घ्या कशी केली जाते शेती?

  • यमुना सफेद-१

ही जात एन.एच.आर.डी.एफ येथे विकसित केली आहे. या जातीच्या गाठी पांढऱ्या रंगाचे असतात. तर सरासरी उत्पन्न १५० ते १७५ क्विंटल प्रति हेक्टर असते.

PM Kisan Yojana । निवडणुकांपूर्वी सरकार देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! खात्यात येणार ‘इतके’ पैसे

  • यमुना सफेद-२- (जी-५०)

या जातीचे गड्डे आकर्षक पांढरे, प्रति गला ३५-४० पाकळया असतात तर या सरासरी उत्पन्न १५० ते २०० क्विंटल मिळते.

Success Story । भारीच! फुलशेतीनं चमकलं शेतकऱ्याचं नशीब, दरमहा कमावतोय 9 लाख रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *