Sugarcane Farming

Sugarcane Farming | ऊसाचे उत्पादन न निघणाऱ्या भागात लागवड करून कमावले लाखो रुपये! वाचा ‘या’ शेतकऱ्याची कमाल

कृषी सल्ला

Sugarcane Farming | शेती व्यवसायातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी मुख्यतः नगदी पिकांचे उत्पादन घेतात. यामध्ये आले, ऊस, सोयाबीन, कापूस यांसारख्या नगदी पिकांचा समावेश होतो. दरम्यान गुजरातमधील एका शेतकऱ्याने काळ्या ऊसाची ( Black Sugarcane) लागवड करून लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे.

Ajit Pawar | ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

सावरकुंडला तालुक्यातील जेजाद गावाच्या हरेशभाई देगडा यांनी आपल्या शेतात काळ्या ऊसाचे उत्पादन घेतले आहे. विशेष बाब म्हणजे हरेशभाई यांच्याआधीच्या अनेक पिढ्या वर्षानुवर्षे शेती व्यवसायात आहेत. परंतु, हरेशभाईंनी मात्र जैविक शेतीचा पर्याय निवडून चांगली कसदार शेती केली आहे.

Narendra Modi | सरकाकडून शेतकऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट! नमो शेतकरी महासन्मान योजनेचे जमा होणार पैसे

खरंतर हरेशभाई ज्या भागात शेती करतात त्या भागात ऊसाचे उत्पादन होत नाही. मात्र तरी देखील मागील एक वर्षापासून ते अतिशय यशस्वीपणे ऊसाची शेती करत आहेत. मागील वर्षी हरेशभाईंच्या ऊसाला 250 ते 350 प्रति 20 किलो असा दर मिळाला होता. यंदा त्यांनी 3 हेक्टर क्षेत्रात ऊसाची लागवड केली असून त्यातून जवळपास 22 लाखांचे उत्पादन मिळेल असा अंदाज आहे.

Narendra Modi | सरकाकडून शेतकऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट! नमो शेतकरी महासन्मान योजनेचे जमा होणार पैसे

हे पीक तयार होण्यासाठी सुमारे 11 महिन्यांचा कालावधी लागतो. या ऊसाचा उपयोग मुख्यतः खाण्यासाठी केला जातो. परंतु, साखर किंवा गूळ तयार करण्यासाठी हा ऊस वापरला जात नाही. यामध्ये कोल्हापुरी काळा, मद्रासी काळा आणि सफेद जामनगरी या जातींचा समावेश होतो. योग्य व्यवस्थापन केल्यास आणि काळजी घेतल्यास या ऊसाच्या उत्पादनातून तुम्ही लाखो रुपये कमावू शकता.

Pomegranate Insurance | डाळिंबांच्या बागांनाही मिळते विमा संरक्षण; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *