Brush Cutter

Brush Cutter | गवत, चारा आणि पीक कापणी करणारे ब्रश कटर यंत्र तुम्हाला माहित आहे का? आंतरमशागतीसाठी सुद्धा होतो उपयोग!

तंत्रज्ञान

Brush Cutter | शेतीसाठी विविध छोटी मोठी अवजारे वापरली जातात. ब्रश कटर हे यातीलच एक ! खरंतर ब्रश कटर हे एक बहुउपयोगी कृषियंत्र आहे. गवत, चारा आणि पीक कापणीसाठी या कटरचा वापर केला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे ब्रश कटर सोबत 2 ते 3 वेगवेगळी जोडणी यंत्रे उपलब्ध आहेत. यामुळे आंतरमशागतीसाठी देखील हे यंत्र वापरले जाते.

Narendra Modi | सरकाकडून शेतकऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट! नमो शेतकरी महासन्मान योजनेचे जमा होणार पैसे

ब्रश कटरचे इंजिन, शाफ्ट पाइप, हॅंडल आणि कटिंग युनिट असे चार प्रमुख भाग आहेत. बाजारात दोन प्रकारांमध्ये हे कटर उपलब्ध असते. यातील एक कटर शेतकऱ्यांना उजव्या खांद्यावर अडकवून काम करता येते. तर दुसरे ब्रश कटर फवारणी पंपासारखे थेट पाठीवर घेऊन काम करता येते.

Ajit Pawar | ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Structure | ब्रश कटरची रचना नक्की कशी आहे ?

ब्रश कटरमध्ये मुख्यतः नायलॉन दोरीचा वापर करून शेतात वाढलेले गवत कापले जाते. तसेच कटरची उपयुक्तता वाढवण्यासाठी त्याला वेगवेगळे गोलाकार दातेरी ब्लेड लावण्याची सुविधा आहे. ब्रश कटर सोबत 2 ते 3 वेगवेगळी जोडणी यंत्रे उपलब्ध असतात. त्यामध्ये दोन छोटे टिलर असतात. या टिलरला ‘L’ आकाराचे ब्लेड असते तर दुसऱ्या टिलरला आडवे ब्लेड गोलाकार पद्धतीने जोडलेले असते. 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक अशा दोन इंजिन मॉडेलमध्ये ब्रश कटर उपलब्ध असते.

Maharashtra Drought | मोठी बातमी! राज्यसरकार लवकरच दुष्काळ जाहीर करणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती

Uses | ब्रश कटरचे उपयोग

  1. गहू कापणी तसेच भात कापणी करण्यासाठी ब्रश कटरचा वापर होतो.
  2. बांधावरील गवत वाढलेले असेल तर त्यासाठी ब्रश कटर वापरले जाते यासाठी 2 ते 3 दातेरी ब्लेडचा वापर केला जातो.
  3. ब्रश कटरला असणाऱ्या टिलरचा उपयोग मातीची वरवर मशागत करण्यासाठी आणि पिकातील तण मुळासकट काढण्यासाठी केला जातो.
  4. तसेच या कटरला करवत जोडता येतो. त्याचा उपयोग झाडाच्या अतिरिक्त वाढलेल्या फांद्या काढण्यासाठी करता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *