Ajit Pawar

Ajit Pawar | ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

बातम्या

Ajit Pawar | राज्यातील बहुतेक कारखान्यांमध्ये गळीत हंगामाची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान पुन्हा एकदा ऊसतोड कामगारांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. मात्र यावेळी ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. या कामगारांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन मागण्यांबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी सांगितले.

Narendra Modi | सरकाकडून शेतकऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट! नमो शेतकरी महासन्मान योजनेचे जमा होणार पैसे

सोमेश्वर साखर करखाण्याच्या 62 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलताना अजित पवार यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली असून त्यामाध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. असे देखील त्यांनी सांगितले.

Pomegranate Insurance | डाळिंबांच्या बागांनाही मिळते विमा संरक्षण; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

यावेळी अजित पवारांनी सोमेश्वर साखर कारखान्याचे कौतुकही केले आहे. ” सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वाटचाल अगदी योग्य दिशेने सुरु आहे. 2022-23 या गाळप हंगामाकरीता राज्यात सर्वाधिक असा प्रती टन 3 हजार 350 रुपये इतका ऊसदर जाहीर केला आहे. येत्या काळातही आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी संचालक मंडळांने प्रयत्न करावेत. तसेच यंदाचे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे ऊसाच्या क्षेत्रात आणि साखर उत्पादनात होणारी घट याचाही विचार करावा, ” असे अजित पवार म्हणाले.

Sarkari Yojna । आनंदाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार विविध सोयीसुविधांचा लाभ; लवकर करा अर्ज

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून पुणे, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्याला पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. जनाई सिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी अत्याधुनिक पंप व त्यासंबंधित बाबी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. मल:निस्सारण प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी वापरण्याबाबत विचार सुरू आहे. मुळशी धरणातील पाणी वीजनिर्मिती ऐवजी जिल्ह्यातील हवेली पुरंदर, इंदापूर, दौंड, बारामती तालुक्यातील भागाला मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी देखील पाणी काटकसरीने वापरून बचत करावी, असे अजित पवार म्हणाले.

Maharashtra Drought | मोठी बातमी! राज्यसरकार लवकरच दुष्काळ जाहीर करणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *