Maharashtra Drought

Maharashtra Drought | मोठी बातमी! राज्यसरकार लवकरच दुष्काळ जाहीर करणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती

बातम्या

Maharashtra Drought | शेतीसाठी पाऊस फार महत्त्वाचा असतो. मात्र अलीकडच्या काळात निसर्गाचा समतोल बिघडला आहे. यंदा तर राज्यात अवर्षणाची स्थिती तयार झाली आहे. पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार येत्या दोन दिवसांत दुष्काळ (Drought) जाहीर करणार आहे.

Success Story | डाळिंबाची शेती करून तरूण शेतकऱ्याने कमावले कोट्यवधी रुपये!

सद्यस्थितीत राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांतील 42 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. परंतु सर्व निकषांच्या छाननीनंतर यातील फक्त 40 जिल्ह्यांमध्येच दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्र सरकारने 2017 मध्ये जाहीर केलेल्या निकषांप्रमाणे सप्टेंबर महिन्यात छाननी करण्यात आली होती.

Inspirational Story | शेतातील तण विकून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये! या पठ्ठ्याची कमाल एकदा वाचाच…

Eligible Area | राज्यातील 42 तालुके दुष्काळपात्र

यावेळी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे राज्यातील 42 तालुके दुष्काळ पात्र ठरले होते. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील 194 तालुक्यांमध्ये पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. परंतु, दुसऱ्या ट्रिगरनुसार माहिती भरण्यात आल्यानंतर त्यातील केवळ 42 तालुके पात्र ठरले आहेत. या पात्र तालुक्यांची आता नव्याने छाननी करण्यात आली असून त्यातील दोन तालुके कमी होण्याची शक्यता आहे.

Onion Rate । महाराष्ट्रात कांद्याचा घाऊक भाव 4500 रुपये प्रति क्विंटल, जाणून घ्या राज्यातील बाजारभाव

कशाच्या आधारावर छाननी होते ?

एखाद्या भागात दुष्काळ जाहीर करण्याआधी दोन टप्प्यांमध्ये ( ट्रिगरमध्ये) छाननी होते. यातील पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानातील तूट तपासली जाते. यानंतर दुसरा टप्पा लागू होतो. यामध्ये पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांक, प्रभावदर्शक निर्देशांक, सामान्य फरक वनस्पती निर्देशांक (एनडीव्हीआय), सामान्य आर्द्रता निर्देशांक (एनडीडब्ल्यूआय) आणि वनस्पती स्थिती निर्देशांक तपासण्यात येतात. याशिवाय वनस्पती स्थिती निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृदा आर्द्रता निर्देशांक, पाणीविषयक निर्देशांक, भूजल पातळी निर्देशांक देखील तपासले जातात.

Spiny Gourd Farming | शेतकरी मित्रांनो मालामाल करणाऱ्या ‘या’ पिकाची लागवड एकदा कराच! मिळेल लाखोंचे उत्पन्न

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कोणत्या सवलती मिळणार ?

  1. शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट मिळते.
  2. पीक कर्जाचे पुनर्गठन होते.
  3. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती देण्यात येते.
  4. कृषिपंपांच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सूट मिळते.
  5. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होते.
  6. ‘रोहयो’अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता देण्यात येते.
  7. आवश्यक ठिकाणी पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स उपलब्ध होतात.
  8. कृषिपंपांना अखंडित वीज पुरविण्यात येते.

Havaman Andaj । मोठी बातमी! देशातील ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *