Havaman Andaj

Havaman Andaj । आज कुठे कोसळणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

हवामान

Havaman Andaj । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आपल्या सर्वांना दरवर्षी सहन करावा लागतो. यावर्षी राज्यात उशिरा पावसाने (Rain Update) हजेरी लावली होती. त्यात पावसाने काही ठिकाणी पाठ फिरवली. पाऊस नसल्याने पिके करपून गेली होती. काही भागात दुबार पेरणीची वेळ आली होती, मागील काही दिवसांपासून देशातील हवामान बदलत आहे. पावसाने पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे.

Poultry Farm । भावाच्या जिद्दीला सलाम! पोल्ट्री व्यवसाय सुरु केला अन् कमवतोय लाखो रुपये

या राज्यांत अलर्ट जारी

भारतीय हवामान खात्याच्या मतानुसार, शुक्रवारी किनारपट्टी ओडिशा, तटीय गंगा पश्चिम बंगाल, त्रिपुरा, तटीय आंध्र प्रदेश, मणिपूर, मिझोराम, यानाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि इतर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याकडून या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर अंदमान आणि निकोबार बेटांवरही हलक्या स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडू शकतो. तर दुसरीकडे, राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांत डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. आगामी काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढेल, असे हवामान खात्याचे मत आहे.

Success Story । शेतकऱ्याची कमालच न्यारी! उजनीच्या तीरावर केली स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड, सव्वा एकरात मिळाले तब्बल २० लाखांचे उत्पन्न

दिल्लीत वाढणार प्रदूषण

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचा धोका कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गुरुवारी देखील लोकांना प्रदूषणापासून कोणताही दिलासा मिळाला नाही. वाऱ्याअभावी दिल्लीचे तापमान कमी होत चालले आहे. काल रात्र मोसमातील सर्वात थंड दिवस होता. एकाच दिवसात अचानक 3 अंशांची घसरण झाली आहे. त्यामुळे तापमान कमीत कमी 10.9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. याचा थेट परिणाम म्हणजे दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी कमी होण्याऐवजी वाढण्याची लक्षणे आहेत.

Asafoetida History | जेवणाची चव वाढवणारा हिंग भारतात कोठून आला? जाणून घ्या हिंगाचे आरोग्यदायी फायदे

राज्यावर पुन्हा संकट

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने पिके धोक्यात आली आहे. पशुपालकांना चारा जास्त किमतीने खरेदी करावा लागत आहे. अगोदरच दुधाचे कमी झालेले दर त्यात वाढलेल्या चाऱ्याच्या किमतींमुळे दूध व्यवसाय धोक्यात आला आहे. जनावरांना चारा कोठून उपलब्ध करायचा असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.

Milk Rate । दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आंदोलन करणार, तारीखही झाली निश्चित

या कारणामुळे पडत होता अवकाळी पाऊस

राज्याला थंडीची चाहूल लागली असतानाच राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस पडत आहे. अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव वाढत चालला आहे. या पावसामुळे काही भागातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Tur Market Today । शेतकऱ्यांची पुन्हा निराशा! कमी झाले तुरीचे दर, प्रति क्विंटल दोन हजारांचा फटका

कमी दाबाचा पट्टा तयार

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच अरबी समुद्राच्या वायव्य आणि पूर्वमध्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. समुद्राचं बाष्प थेट महाराष्ट्र राज्यावर येत आहे. खास करून दक्षिण महाराष्ट्राच्या बाजूला त्याचा प्रभाव जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. भूगर्भातील पाण्याचं आणि समुद्रातील पाण्याचं बाष्पीभवन होत आहे. ऋतूंच्या सीमारेषा नाहीशा होत चालल्या आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

PM Kisan Yojana । निवडणुकांपूर्वी सरकार देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! खात्यात येणार ‘इतके’ पैसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *