Silk Market Rate । शेती कोरडवाहू असल्याने अनेक शेतकरी पारंपरिक पिके म्हणजे सोयाबीन, मुग, ज्वारी, बाजरी, कापूस आणि तुरीचे उत्पादन घेतात. शेतकऱ्यांना कधी दुष्काळाचा तर कधी अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. परंतु मागील काही वर्षापासून शेतकरी रेशीम शेतीचा प्रयोग अमलात आणत आहेत. यातून त्यांना हजारो रुपयांचा फायदा होतो.
Havaman Andaj । आज कुठे कोसळणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
शेतकऱ्यांना रेशीम कोशातून चांगल्या उत्पन्नाचा मार्ग मिळाला आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागातील शेतकरी रेशीम शेती फुलवत आहे. आता नांदेड जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून रेशीम शेतीकडे (Silk Market) वळू लागले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुती लागवडीसाठी (Sericulture cultivation) सरकार आता प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर रेशीम शेती (Sericulture farming) करत आहेत.
Apple Cultivation । कशी बहरली हिमाचलची ओळख असणाऱ्या सफरचंदाची शेती? जाणून घ्या
२०० एकरांवर लागवडीचे उद्दिष्ट
दरम्यान, चालू वर्षी २०२३-२४ साठी जिल्ह्याला २०० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. यासाठी जिल्ह्यातील एकूण ५४० शेतकऱ्यांनी ६४५ एकरांसाठी नोंदणी केली आहे. परंतु यंदा लांबणीवर पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना तुतीची रोपे तयार करता आली नसल्याने यंदा तुतीची लागवड मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यात नवीन १५० शेतकऱ्यांनी १५० एकरांवर लागवड (Sericulture farming information) केली आहे.
Poultry Farm । भावाच्या जिद्दीला सलाम! पोल्ट्री व्यवसाय सुरु केला अन् कमवतोय लाखो रुपये
जिल्ह्यात ४६४ एकरांवर रेशीम शेती आहे. किटक संगोपणगृह बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी रेशीम शेतीकडे वळू लागली आहेत. विक्रीसाठी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड कृषी उत्पन्न बाजार समिती, पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती, कर्नाटक राज्यातील रामनगरम या बाजारात पाठवण्यात येत आहे. पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्यातील व्यापारी खरेदीसाठी नांदेडला येत आहेत.
रेशीम कोशांना उच्चांकी म्हणजे 52 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकरी आनंदित झाले आहेत. आता या शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. दरम्यान, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेतीचा प्रयोग केल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात रेशीमशेती कडे शेतकऱ्यांचा कल वाढू शकतो.
Asafoetida History | जेवणाची चव वाढवणारा हिंग भारतात कोठून आला? जाणून घ्या हिंगाचे आरोग्यदायी फायदे