Havaman Andaj । दिल्लीत वाढत्या प्रदूषणाबरोबरच आता थंडीही वाढली आहे. शुक्रवारी राजधानी दिल्लीत नोव्हेंबरमधील किमान तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवले गेले. हवामान खात्यानुसार, 27 नोव्हेंबर रोजी दिल्लीत रिमझिम आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर थंडी आणखी वाढू शकते. अशा स्थितीत घोंगडी, रजई बाहेर काढण्याची वेळ आली आहे. आज आकाशात ढगांची चलबिचल राहील. त्याचबरोबर २६ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत धुके दिसू शकते. (Weather Forecast)
Corn Crop Management । मका लागवड करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, मिळेल भरघोस उत्पादन
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 27 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. दिल्ली एनसीआरमध्येही आज हलके धुके दिसत आहे. मात्र वायू प्रदूषणाच्या पातळीत कोणतीही घट झालेली नाही. (Agriculture News)
या राज्यांमध्ये पाऊस पडेल
उत्तर भारतातील राज्यांमध्ये वाढत्या थंडीमध्ये पावसाच्या अलर्टमुळे लोकांच्या चिंता वाढू लागल्या आहेत. हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. IMD नुसार केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Organic Vegetables । मस्तच! आता सेंद्रिय भाजीपाला पिकवून मिळवा सरकारी अनुदान, असा घ्या लाभ
याशिवाय 27 नोव्हेंबर रोजी उत्तराखंडच्या विविध भागात गारपिटीसह वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. IMD नुसार, शनिवारी दक्षिण अंदमान समुद्र आणि आसपासच्या भागात एक परिसंचरण तयार होईल, ज्याचा परिणाम हवामानावर देखील दिसून येईल.
Cotton Price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पांढऱ्या सोन्याचे वाढले दर, महिन्याभरात होणार आणखी वाढ
महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी
सध्या राज्याभर ढगाळ हवामान झाले असून, आज कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे. तर उद्या (ता. २६) धुळे, नाशिक, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपीट होण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.
Success Story । काय सांगता! दोन एकरात 11 प्रकारची पिकं, ही महिला वर्षाला कमावतेय 7 लाख रुपये
डोंगरावर बर्फवृष्टी
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पर्वतांवरही बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 25 नोव्हेंबरच्या रात्रीपासून नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स पर्वतांच्या दिशेने येत आहे. 26 ते 27 नोव्हेंबर दरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो.