Havaman andaj । पश्चिम हिमालयीन क्षेत्रावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (Western Disturbance) परिणाम होणार आहे, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवर्षाव होणार आहे. राज्यातील शेतकरी यंदा चांगलाच हवालदिल झाला आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने राज्यातील (Rain in Maharashtra) काही भागांमध्ये पाठ फिरवली. पाऊस वेळेत न पडल्याने पिके जळून गेली. अशातच आता काही ठिकाणी अवकाळी (Unseasonal rain) आणि गारपीटीची शक्यता आहे.
Onion Export । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! सरकारने हटवली कांदा निर्यात बंदी
गारपिटीसह अवकाळीचा शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजपासून पुढील ३ ते ४ दिवस देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार आहे. देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या संपूर्ण आठवड्यात दिल्लीचे किमान तापमान ९ ते ११ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २४ ते २७ अंशांच्या दरम्यान राहील. (Rain update)
लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. हरियाणा, पंजाब आणि दिल्लीमध्ये आजपासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
Government Schemes । पशुपालकांना पशुधन विभागाचे आवाहन! वैरण, बियाणांसाठी करा अर्ज सादर
उत्तर मध्य प्रदेशातही ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही भागात गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रातील अनेक भागातून थंडी गायब झाली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसाची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.